Mahabreaking

[breaking_news]

strong opposition: ग्रामस्थांचा तीव्र विरोध; कातखेड परिसरातील खदानीत अवैध स्फोट सुरूच

strong opposition: बार्शीटाकळी तालुक्यातील कातखेड गावालगत असलेल्या खदानीत दर पंधरा दिवसांनी अवैध स्फोट केले जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकाराला गावकऱ्यांचा प्रचंड विरोध असतानाही स्फोटांचे प्रकार सुरूच असून, प्रशासनही या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

strong

   दर पंधरा दिवसांनी स्फोटांचा धडाका; हादऱ्यांनी ग्रामस्थ भयभीत

विझोरा : बार्शीटाकळी तालुक्यातील कातखेड गावालगत असलेल्या खदानीत दर पंधरा दिवसांनी अवैध स्फोट केले जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकाराला गावकऱ्यांचा प्रचंड विरोध असतानाही स्फोटांचे प्रकार सुरूच असून, प्रशासनही या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

या संदर्भात काही नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावालगतच्या खदानीत दर पंधरा दिवसांनी यंत्राच्या साहाय्याने खोल होल पाडून उच्च क्षमतेचे स्फोट घडवून आणले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गौण खनिजाच्या उत्खननासाठी गेल्या काही वर्षांपासून हे स्फोट वारंवार केले जात असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.

या स्फोटांमुळे परिसरात प्रचंड आवाज होत असून जमिनीला हादरे बसत असल्याचा अनुभव ग्रामस्थांना येत आहे. त्यामुळे गावातील घरांना धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, या गंभीर प्रकाराची प्रशासनाला माहिती असूनही जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित खदान मंजूर क्षमतेपेक्षा अधिक खोल असल्याचाही आरोप करण्यात येत आहे.

तसेच खदानीलगत असलेल्या स्टोन क्रशर प्लांटमुळे परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट पसरत आहेत. परिणामी वातावरणात प्रदूषण वाढत असून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. विविध आजारांचा धोका वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

या गंभीर प्रकरणाची जिल्हा प्रशासनाने तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन खदानीतील कथित अवैध स्फोटांची चौकशी करावी आणि प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक ती कठोर कारवाई करावी, अशी मागणी कातखेड परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top