Mahabreaking

[breaking_news]

 Rakhi: धागा शौर्य का राखी अभियान थेट सीमेवर; जवानांच्या मनगटावर बांधला बहिणींच्या प्रेमाचा धागा

Rakhi: धागा शौर्य का राखी अभियान थेट सीमेवर; जवानांच्या मनगटावर बांधला बहिणींच्या प्रेमाचा धागादेशाच्या सीमेवर मातृभूमीच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या जवानांपर्यंत बहिणींच्या प्रेमाचा आणि आशीर्वादाचा धागा पोहोचविणारे ‘धागा शौर्य का राखी’ अभियान यंदाही भावनिक क्षणांचे साक्षीदार ठरले. रक्षाबंधनानिमित्त सीमेवर तैनात जवानांच्या मनगटावर कुरणखेड परिसरातील विद्यार्थिनी बहिणींनी प्रेमाने पाठविलेल्या राख्या बांधण्यात आल्या.

 Rakhi

कुरणखेडच्या विद्यार्थिनींनी पाठविलेल्या राख्यांनी देशसेवा, बंधुभाव आणि राष्ट्रप्रेमाचा दिला संदेश

बोरगाव मंजू : देशाच्या सीमेवर मातृभूमीच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या जवानांपर्यंत बहिणींच्या प्रेमाचा आणि आशीर्वादाचा धागा पोहोचविणारे ‘धागा शौर्य का राखी’ अभियान यंदाही भावनिक क्षणांचे साक्षीदार ठरले. रक्षाबंधनानिमित्त सीमेवर तैनात जवानांच्या मनगटावर कुरणखेड परिसरातील विद्यार्थिनी बहिणींनी प्रेमाने पाठविलेल्या राख्या बांधण्यात आल्या.

कुरणखेड परिसरातील आर्मी जवान सतीश नागे, पुण्यविर खंडारे आणि रोशन मोहोड यांनी विविध ठिकाणी आपल्या पोस्टवर या राख्या स्वीकारत विद्यार्थी बहिणींचे मनापासून आभार मानले. सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या जवानांच्या मनगटावर कुरणखेडच्या बहिणींच्या प्रेमाचा हा धागा पोहोचल्याने ‘बहिणींचे प्रेम आणि जवानांचे शौर्य’ यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला.

रक्ताचे नाते नसतानाही देशाच्या रक्षणासाठी सीमेवर उभ्या असलेल्या सैनिकांना भाऊ मानून विद्यार्थिनींनी पाठविलेल्या या राख्यांनी देशसेवा, बंधुभाव आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला. ‘सीमेवर जवान, तर गावात बहिणींची प्रार्थना… मनगटावर राखी आणि हृदयात मातृभूमी!’ या भावनेने या अभियानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

जवानांप्रती कृतज्ञतेचा भावनिक सेतू

‘धागा शौर्य का राखी’ अभियान हे केवळ राखी पाठविण्याचे अभियान नसून, देशाच्या रक्षणासाठी उभ्या असलेल्या प्रत्येक जवानाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा भावनिक सेतू ठरत आहे. या उपक्रमातून सीमेवर तैनात जवान आणि देशातील नागरिक यांच्यातील आपुलकीचे नाते अधिक दृढ होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

या उपक्रमामुळे कुरणखेड परिसरातील विद्यार्थिनींनी देशसेवेत योगदान देणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. जवानांचे शौर्य आणि बहिणींच्या प्रेमाचा हा अनोखा धागा राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करणारा ठरला.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने सीमेवर पोहोचलेल्या या राख्यांमुळे जवानांच्या कर्तव्याला आणि त्यागाला सलाम करण्याबरोबरच देशाच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्याप्रती असलेले प्रेम आणि आदरही व्यक्त झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top