Mahabreaking

[breaking_news]

Blood donation camp :राजे राजेंद्रसिंह जाधव यांच्या स्मृतिदिनी रक्तदान शिबिर; अधिकाधिक रक्तदात्यांनी सहभागी व्हावे

Blood donation camp :स्थानिक श्री बालाजी संस्थान, देऊळगाव राजा यांच्या वतीने संचालित श्री व्यंकटेश महाविद्यालयात कै. श्रीमंत राजे राजेंद्रसिंह जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Blood

 ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’; श्री व्यंकटेश महाविद्यालयात २९ ऑगस्टला रक्तदान शिबिर

देऊळगाव राजा : स्थानिक श्री बालाजी संस्थान, देऊळगाव राजा यांच्या वतीने संचालित श्री व्यंकटेश महाविद्यालयात कै. श्रीमंत राजे राजेंद्रसिंह जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

राजे लखोजीराव जाधव यांचे १४ वे वंशज, श्री बालाजी संस्थानचे पूर्वीचे वंशपरंपरागत विश्वस्त तसेच महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष कै. श्रीमंत राजे राजेंद्रसिंह जाधव यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

महाविद्यालयाच्या एनएसएस, एनसीसी, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग तसेच रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकीतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. एका रक्तदात्याच्या योगदानातून अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होते. त्यामुळे परिसरातील इच्छुक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन श्री बालाजी संस्थानचे विद्यमान वंशपरंपरागत विश्वस्त तथा महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव, प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे आणि संयोजकांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top