Mahabreaking

[breaking_news]

Theft :टिनपत्र कापून किराणा दुकानात चोरी; १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास

Theft : देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथे अज्ञात चोरट्याने किराणा दुकानाच्या छतावरील टिनपत्र कापून दुकानात प्रवेश केला आणि गल्ल्यातील रोख रकमेसह काजू-बदाम व इतर ड्रायफ्रूट असा एकूण १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Theft
देऊळगाव महीत मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ; रोख रकमेसह काजू-बदामावर डल्ला

गजानन तिडके
देऊळगाव राजा : देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथे अज्ञात चोरट्याने किराणा दुकानाच्या छतावरील टिनपत्र कापून दुकानात प्रवेश केला आणि गल्ल्यातील रोख रकमेसह काजू-बदाम व इतर ड्रायफ्रूट असा एकूण १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देऊळगाव मही येथील किराणा दुकानदार प्रकाश दिनकर शिंगणे (वय ४२) यांच्या दुकानात ही चोरी झाली. २५ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजेपासून २६ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने दुकानाच्या टिनपत्राचे छत कापले. त्यानंतर दुकानात प्रवेश करून गल्ल्यात ठेवलेली २ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.
याशिवाय दुकानातील सुमारे १५ हजार रुपये किमतीचे काजू, बदाम व इतर ड्रायफ्रूट असा मुद्देमालही चोरट्याने लंपास केला. रोख रक्कम व चोरीस गेलेल्या मालाची एकूण किंमत १७ हजार ५०० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दुकान उघडल्यानंतर चोरीचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर प्रकाश शिंगणे यांनी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तोंडी फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०५ व ३३४(१) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल कलीम देशमुख (ब.नं. १४०२) करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलिस हेड कॉन्स्टेबल गजानन काकड (ब.नं. २०५०) यांनी केली. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top