Mahabreaking

[breaking_news]

Keep liquor sales closed :ईद-ए-मिलादुननबीला मद्यविक्री बंद ठेवा; राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे निवेदन

Keep liquor sales closed :ईद-ए-मिलादुननबीच्या पवित्र सणानिमित्त २६ ऑगस्ट २०२६ रोजी बाळापूर शहरातील देशी-विदेशी मद्यविक्रीची दुकाने आणि बार बंद ठेवावेत, अशी मागणी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात बाळापूर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

liquor sales

   मिलादुननबीच्या पार्श्वभूमीवर दारू दुकाने बंदची मागणी; प्रशासनाला निवेदन

बाळापूर : ईद-ए-मिलादुननबीच्या पवित्र सणानिमित्त २६ ऑगस्ट २०२६ रोजी बाळापूर शहरातील देशी-विदेशी मद्यविक्रीची दुकाने आणि बार बंद ठेवावेत, अशी मागणी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात बाळापूर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, २६ ऑगस्ट रोजी मुस्लिम बांधवांकडून पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांचा जन्मदिवस असलेला ईद-ए-मिलादुननबी हा सण श्रद्धा आणि उत्साहात साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने शहरात विविध धार्मिक कार्यक्रम तसेच मिरवणुका आयोजित केल्या जातात.

सणाच्या दिवशी काही व्यक्ती मद्यप्राशन करून सार्वजनिक शांतता भंग करण्याची किंवा वाद निर्माण करण्याची शक्यता असते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, सणाचे पावित्र्य आणि शांतता कायम राहावी, यासाठी शहरातील सर्व मद्यविक्रीची दुकाने व बार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश संबंधित विभागाला द्यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षितता आणि शहरातील कायदा-सुव्यवस्था लक्षात घेऊन २६ ऑगस्ट रोजी मद्यविक्री पूर्णपणे बंद ठेवण्याबाबत तातडीने आदेश निर्गमित करावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.

या वेळी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनाद्वारे सामाजिक एकता, शांतता आणि सलोखा कायम ठेवण्याचा संदेश देण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top