Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

21 months of salary unpaid : २१ महिन्यांचे वेतन थकीत; १०२ रुग्णवाहिका चालकांचा आत्मदहनाचा इशारा, मुख्यमंत्र्यांकडे धाव

21 months of salary unpaid : मागील २१ महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने उपासमारीची वेळ आलेल्या बुलढाणा  जिल्ह्यातील १०२ रुग्णवाहिका कंत्राटी चालकांनी तीव्र संताप व्यक्त करत आत्मदहनाचा इशारा दिला आहे. याबाबत मुख्यमंत्री सचिवालय तसेच राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन सादर करून थकीत वेतन तातडीने देण्याची मागणी करण्यात आली आहे.

21 months of salary unpaid

देऊळगाव राजा : मागील २१ महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने उपासमारीची वेळ आलेल्या बुलढाणा  जिल्ह्यातील १०२ रुग्णवाहिका कंत्राटी चालकांनी तीव्र संताप व्यक्त करत आत्मदहनाचा इशारा दिला आहे. याबाबत मुख्यमंत्री सचिवालय तसेच राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन सादर करून थकीत वेतन तातडीने देण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सामान्य रुग्णालय बुलढाणा तसेच ग्रामीण रुग्णालयांमध्ये कार्यरत कंत्राटी चालकांना मागील २१ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. यापूर्वी ११ जुलै २०२५ रोजी जिल्हा शल्यचिकित्सक बुलढाणा आणि उपसंचालक, आरोग्य सेवा अकोला मंडळ यांच्याकडे वारंवार निवेदने देऊनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. न्याय न मिळाल्याने चालकांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसावे लागले होते. त्या वेळी १५ दिवसांत १८ महिन्यांचे वेतन देण्याचे तोंडी आश्वासन देण्यात आले; मात्र सात महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही वेतन मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय वेतन न देता अनेक कंत्राटी चालकांना कामावरून कमी करून घरी बसविण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून दिवाळीसारखा सणही अंधारात साजरा करावा लागल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. मुलांचे शिक्षण, घरखर्च, औषधोपचार आदी मूलभूत गरजा भागविणे कठीण झाल्याने परिस्थिती अत्यंत बिकट बनल्याचे निवेदनात नमूद आहे.

ग्रामीण रुग्णालय लोणार येथील चालक गजानन दत्तराव देशमुख यांनी सर्व चालकांच्या वतीने मंत्रालयात आत्मदहनाबाबतचे निवेदन दिले होते. मात्र ते मागे घेण्यास भाग पाडल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

कंत्राटी चालकांनी निवेदनात  २१ महिन्यांचे थकीत वेतन तातडीने देण्यात यावे,  कामावरून कमी केलेल्या सर्व चालकांना पुन्हा नियुक्ती द्यावी,  दर महिन्याचे वेतन पाच तारखेपूर्वी देण्याची व्यवस्था करावी तसेच  बंद करण्यात आलेल्या रुग्णवाहिका तातडीने सुरू कराव्यात आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. येत्या १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास आत्मदहनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा चालकांनी दिल्याने आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनात खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणाकडे शासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. निवेदनावर सैय्यद वहीद सै.हमीद, संतोष काकड, सुरेंद्र चव्हाण, प्रविण उमाळे, रमेश मुंडे, ऋषिकेश नागरे, जितेश जवंजाळ आदींसह इतरांची स्वाक्षरी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top