Mahabreaking

[breaking_news]

₹98 Lakhs Sanctioned :मेहकर न्यायालयीन इमारतीच्या बळकटीकरणासाठी ९८ लाख रुपये मंजूर

₹98 Lakhs Sanctioned : न्यायालयाने इमारतींचे बळकटीकरण करण्यासाठी राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाकडून मेहकर न्यायालयाच्या विविध बांधकामांसाठी ९८ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ,सुनेत्राताई पवार आणि विधी व न्याय राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचे माजी आमदार संजय रायमुलकर यांनी आभार मानले आहे.

₹98 Lakhs Sanctioned
माजी आमदार संजय रायमुलकर यांनी मानले महायुती सरकारचे आभार

मेहकर : न्यायालयाने इमारतींचे बळकटीकरण करण्यासाठी राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाकडून मेहकर न्यायालयाच्या विविध बांधकामांसाठी ९८ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ,सुनेत्राताई पवार आणि विधी व न्याय राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचे माजी आमदार संजय रायमुलकर यांनी आभार मानले आहे.
न्यायालय इमारतींच्या बळकटीकरणाचा विषय अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. तत्कालीन आमदार संजय रायमुलकर यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. विधी सल्लागार तथा सहसचिव महाराष्ट्र शासन श्री विलास वसंत गायकवाड यांच्या स्वाक्षरीने विधी व न्याय विभागाचा मंजुरी आदेश परिपत्रक क्रमांक प्र . क्र.१३१/ का.१३ दिनांक ३० एप्रिल २०२६ नुसार प्रसृत करून. मेहकर न्यायालयाच्या इमारतीचे बळकटीकरण करण्यासाठी ९८लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मेहकर येथे दिवाणी व फौजदारी न्यायालय आणि जिल्हा व सत्र न्यायालय अशा दोन इमारती आहेत. नवीन बळकटीकरणाच्या बांधकामामुळे विविध कामे केली जाणार आहेत.
जिल्हा व सत्र न्यायालय बुलढाणा चे न्यायधीश यांच्या सहमतीने कामांच्या तरतुदीला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. यामध्ये अंतर्भूत असलेल्या सर्व कामांचे एकत्रित निविदा काढण्यात याव्यात असे सदर परिपत्रकात म्हटले आहे. सदर कामास मंजुरी दिल्याबद्दल माजी आमदार संजय रायमुलकर यांनी महायुती सरकारचे आभार मानले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top