Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Youth from Pimpalgaon Raja dies: रेल्वे पुलावर रील काढणे बेतले जीवावर, पिंपळगाव राजा येथील युवक ठार एक गंभीर

Youth from Pimpalgaon Raja dies: समाजमाध्यमावर रिल काढण्याचा युवकांमध्ये ट्रेंड वाढला आहे. पिंपळगाव राजा येथील युवकाला रेल्वे पुलावर रील काढणे जीवावर बेतले आहे. कानात हेडफाेन असल्याने ट्रेनचा आवाजच आला नाही. त्यामुळे, समीर रफिक शेख (२०) याचा मृत्यू झाला तर त्याचा नातेवाईक शाकीर शेख गंभीर जखमी झाला.ही घटना २९ ऑक्टाेबर राेजी आळसणा येथील रेल्वे पुलावर घडली.

Youth from Pimpalgaon Raja dies

आळसणा गावाजवळ रील काढत असताना ट्रेनने दिली धडक

शेगाव : समाजमाध्यमावर रिल काढण्याचा युवकांमध्ये ट्रेंड वाढला आहे. पिंपळगाव राजा येथील युवकाला रेल्वे पुलावर रील काढणे जीवावर बेतले आहे. कानात हेडफाेन असल्याने ट्रेनचा आवाजच आला नाही. त्यामुळे, समीर रफिक शेख (२०) याचा मृत्यू झाला तर त्याचा नातेवाईक शाकीर शेख गंभीर जखमी झाला.ही घटना २९ ऑक्टाेबर राेजी आळसणा येथील रेल्वे पुलावर घडली.
समीर रफिक शेख व शाकीर शेख हे आळसणा येथे लग्नासाठी आले हाेते. दरम्यान, रेल्वे पुलावरून जाताना त्यांनी मोबाइलवर रील तयार करण्याच्या मोहात रेल्वे रुळावर बसून व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी कानामध्ये हेडफोन असल्याने येणाऱ्या ट्रेनचा आवाज त्यांना ऐकू आला नाही. अचानक आलेल्या ट्रेनने दोघांना धडक दिली. यात समीर शेखचा जागीच मृत्यू झाला, तर शाकीर शेख गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच शेगाव रेल्वे पोलिस सुरक्षा बलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी युवकास तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले असून, उपचार सुरू आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top