Wrestlers from Dhule and Washim : श्री बालाजी महाराज यात्रा महोत्सवानिमित्त समस्त वैदू समाजाच्या वतीने देऊळगाव राजा येथे दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी पारंपरिक जंगी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तब्बल ७० वर्षांची परंपरा लाभलेली ही कुस्ती स्पर्धा आजही तेवढ्याच उत्साहात पार पडली.

देऊळगाव राजा : श्री बालाजी महाराज यात्रा महोत्सवानिमित्त समस्त वैदू समाजाच्या वतीने देऊळगाव राजा येथे दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी पारंपरिक जंगी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तब्बल ७० वर्षांची परंपरा लाभलेली ही कुस्ती स्पर्धा आजही तेवढ्याच उत्साहात पार पडली.
स्पर्धेचे उद्घाटन आमदार मनोज कायंदे आणि मुख्याधिकारी अरुण मोकळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर होते. या स्पर्धेत धुळे आणि वाशीम जिल्ह्यांतील नामांकित पैलवानांनी जोरदार झुंज दिली. प्रथम बक्षीस ५१ हजार आणि द्वितीय बक्षीस ११ हजार असे ठेवण्यात आले होते. अंतिम फेरीत धुळेच्या राजपूत पैलवान आणि वाशीमच्या पैलवानामध्ये चुरशीचा सामना रंगला. तब्बल दीड तास चाललेल्या या रोमांचक लढतीत वेळअभावी निकाल लागला नाही आणि दोन्ही पैलवानांना समान बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमावेळी पोलीस निरीक्षक ब्रम्हगिरी, उपनिरीक्षक दत्तात्रय नरवाडे, गट शिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले, राजेश भुतडा, नंदन खेडेकर, इस्माईल बागवान, केंद्रप्रमुख बबन कुमठे, डॉ. उमेश मुंडे, डॉ. सुनील कायंदे, राजूभाऊ इंगळे, गोविंदराव झोरे, दादराव खार्डे, निशिकांत भावसार, आतिश कासारे, रमेश कायंदे, राजेश इंगळे, डोईफोडे सर, हरिभाऊ वाघ, जयदीप नागरे, सौरभ दराडे, प्रदीप वाघ, सदाशिव मुंडे, दिलीपभाई खरात, पैलवान कैलास शेळके, धर्मराज हनुमंते, खैरे साहेब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी अजय शिवरकर मित्र मंडळ आणि समस्त वैदू समाजाच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.

