Medical Officers :ग्रामीण भागातील रुग्णांची वैद्यकीय वाहणी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राकडे बघीतले जाते. त्याठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या की रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार मिळतात . आज साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ . वैष्णवी राठोड आणि डॉ. वैष्णवी मेरत रुजू झाल्या आहेत . त्यांचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे .

साखरखेर्डा : ग्रामीण भागातील रुग्णांची वैद्यकीय वाहणी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राकडे बघीतले जाते. त्याठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या की रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार मिळतात . आज साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ . वैष्णवी राठोड आणि डॉ. वैष्णवी मेरत रुजू झाल्या आहेत . त्यांचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे .
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात या अगोदर वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ.गोपाल परिहार हे काम पहात होते . त्यांची बदली झाल्याने येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ . वैष्णवी दिनकरराव राठोड आणि डॉ . वैष्णवी चंद्रकांत मेरत ह्या रुजू झाल्या आहेत . दोन्ही वैद्यकीय अधिकारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी यश प्राप्त केले आहे . ग्रामीण भागातील असून गावापासून कोसो दूर जाऊन शिक्षण घेतले आहे . बाळसमुद्र या गावात सातवी पर्यंत शाळा असून त्यानंतर साखरखेर्डा येथील जिजामाता विद्यालयात १० पर्यंत वैष्णवी मेरत यांनी शिक्षण घेतले . त्यानंतर उच्च शिक्षणासाठी बाहेर शहरात जाऊन शिक्षण घेऊन वैद्यकीय अधिकारी म्हणून शिक्षण पूर्ण केले . त्यांचे वडील चंद्रकांत मेरत हे शेतकरी असून सरपंच म्हणून पाच वर्षे गावाचा कारभार चोख सांभाळला . पण मुलीला शिक्षणासाठी कोठेही कमतरता भासू दिली नाही . आज त्या वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे . तर वैष्णवी राठोड यांचे वडील सुलतानपूर येथे शिक्षक म्हणून नोकरी करतात . दोन्ही प्रतिकूल परिस्थितीत वैद्यकीय अधिकारी झाल्या आहेत . आज १० एप्रिल रोजी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव , भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुर देशपांडे , भाजप नेते किसनराव आटोळे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . यावेळी नितीन मेरत , चंद्रकांत मेरत , दिलीप खंडारे , डी एन पांचाळ , संतोष मोरे , गोपाल शिराळे , अशोक काळे , सुनील रिंढे , भागवत काळे , अशोक इंगळे पत्रकार , गोपाल मानतकर उपस्थित होते .

