Woman arrested : मलकापूर शहरातील चैतन्यवाडी परिसरात १० ऑक्टाेबर राेजी दिवसाढवळ्या घरफाेडी करणाऱ्या महिलेला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अमरावतीतून अटक केली आहे. तिच्याकडून पाेलिसांनी चाेरी गेलेल्या दागिण्यांसह सहा लाख ८१ हजार रुपयांचा एवज पथकाने जप्त केला आहे. आराेपी महिलेस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला एक दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची दमदार कारवाई : आराेपी महिलेस एक दिवसाची पाेलीस काेठडी
बुलढाणा : मलकापूर शहरातील चैतन्यवाडी परिसरात १० ऑक्टाेबर राेजी दिवसाढवळ्या घरफाेडी करणाऱ्या महिलेला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अमरावतीतून अटक केली आहे. तिच्याकडून पाेलिसांनी चाेरी गेलेल्या दागिण्यांसह सहा लाख ८१ हजार रुपयांचा एवज पथकाने जप्त केला आहे. आराेपी महिलेस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला एक दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली.
रविकुमार शिवाजी राठोड (वय ३२, रा.गांधारी ता.लोणार, ह.मु. चैतन्यवाडी, मलकापूर) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत नमूद केले की, त्यांची पत्नी घराला कुलूप लावून शेजाऱ्यांकडे गेली असताना, अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा उघडून प्रवेश केला. त्यानंतर, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळून सुमारे ६ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.ही घटना १० ऑक्टाेबर राेजी भर दिवसा घडली हाेती. त्यामुळे, शहरात खळबळ उडाली हाेती. राठाेड यांच्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने १७ ऑक्टोबर रोजी खोलापुरी गेट परिसरातून सीमा परवीन नसीम शेख (४५) या महिलेला ताब्यात घेतले. ती मूळची मोडासा, जि.अरोली (गुजरात) येथील रहिवासी असून, सध्या पतीसोबत अमरावती येथे वास्तव्यास असल्याचे आढळले. पोलिसांच्या चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तिच्याकडून ५ तोळे सोनं आणि ५० हजार रुपये रोख असा एकूण मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपी महिलेला मलकापूर पोलिसांनी अटक करून मोताळा न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई जिल्हा पाेलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या आदेशाने तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (खामगाव),
अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड (बुलडाणा) यांच्या मार्गदर्शनात पोनि. सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि. अविनाश जायभाये, पोहेकॉ. दीपक लेकुरबाळे, शेख चांद, गणेश पाटील, पोकॉ. गजानन गोरले, मपोकॉ. आशा मोरे, तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोहेकॉ. राजू आडवे यांच्या पथकाने केली.

