Thanedar Sevanand Wankhade: येथील परशुराम नाईक विद्यालयात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शाळेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बाबासाहेब नाईक स्मृतीप्रित्यर्थ वार्षिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा शालेय क्रीडा महोत्सवाचा थाटात झालेला उद्घाटन सोहळा डॉ. प्रशांत वायचाळ यांच्या हस्ते रविवारी पार पडला.वार्षिक महोत्सवात शालेय स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात क्रीडा स्पर्धा, कला महोत्सव, वादविवाद स्पर्धा, सन्मित्र व्याख्यानमाला, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, आनंद मेळावा आदी शैक्षणिक कार्यक्रमांचा समावेश आहे.

“दहावी–बारावी नंतर पुढे काय? शिक्षणाच्या वाटा”
संजय तायडे
बोरगाव मंजू : येथील परशुराम नाईक विद्यालयात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शाळेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बाबासाहेब नाईक स्मृतीप्रित्यर्थ वार्षिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा शालेय क्रीडा महोत्सवाचा थाटात झालेला उद्घाटन सोहळा डॉ. प्रशांत वायचाळ यांच्या हस्ते रविवारी पार पडला.वार्षिक महोत्सवात शालेय स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात क्रीडा स्पर्धा, कला महोत्सव, वादविवाद स्पर्धा, सन्मित्र व्याख्यानमाला, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, आनंद मेळावा आदी शैक्षणिक कार्यक्रमांचा समावेश आहे.
दहावी–बारावी नंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी योग्य दिशा मिळावी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन व्हावे, या उद्देशाने पोलिस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या संकल्पनेतून “आम्हीही घडलो; तुम्हीही घडा ना!” या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
सन्मित्र व्याख्यानमाला १० डिसेंबर, बुधवार सकाळी ९ वाजता आयोजित केली असून, शाळेचे माजी विद्यार्थी व सध्या पुसद पोलीस स्टेशनचे ठाणेदार असलेले सेवानंदभाऊ वानखडे हे प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत. “आम्हीही घडलो; तुम्हीही घडाना!” या विषयावर ते विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक दिशा, शिक्षणाचे महत्त्व, करिअरविषयक पर्याय आणि यशस्वी जीवनाविषयी मार्गदर्शन करतील. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या या सन्मित्र व्याख्यानमालेस गावातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

