Deulgaon Raja Municipality : देऊळगाव राजा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत प्रभागनिहाय आरक्षण सोडतीची प्रक्रिया दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडली. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार झालेल्या या सोडतीत सिंदखेड राजा उपविभागीय अधिकारी संजय खडसे, मुख्याधिकारी तथा प्रशासक अरुण मोकळ, तसेच नगरपरिषद अधिकारी उपस्थित होते.

ना.मा.प्र महिलांसाठी तीन जागा राखीव
देऊळगाव राजा: देऊळगाव राजा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत प्रभागनिहाय आरक्षण सोडतीची प्रक्रिया दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडली. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार झालेल्या या सोडतीत सिंदखेड राजा उपविभागीय अधिकारी संजय खडसे, मुख्याधिकारी तथा प्रशासक अरुण मोकळ, तसेच नगरपरिषद अधिकारी उपस्थित होते.
सदर आरक्षणानुसार नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी एकूण ६ जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. त्यापैकी ३ जागा महिला प्रवर्गासाठी राखीव ठरल्या. पारदर्शक पद्धतीने ड्रममध्ये ठेवल्या गेलेल्या चिठ्यांपैकी छोट्या मुलांच्या हस्ते काढण्यात आलेल्या चिठ्यांनुसार प्रभाग क्र. १(अ) – ना.मा.प्र महिला, प्रभाग क्र. ६(अ) – ना.मा.प्र महिला, प्रभाग क्र. १०(अ) – ना.मा.प्र महिला या तीनही जागा ना.मा.प्र महिला प्रवर्गासाठी निश्चित झाल्या. उर्वरित तीन जागा ना.मा.प्र सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव राहिल्या.
यानंतर सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी खालील प्रभागांतील एकूण ७ जागा राखीव घोषित करण्यात आल्या. यामध्ये
प्रभाग क्र. २(ब), ३(ब), ४(अ), ७(ब), ८(ब), ९(अ), १०(ब) यांचा समावेश आहे.
सोडतीच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी संजय खडसे होते, तर प्रक्रियेत मुख्याधिकारी अरुण मोकळ, कार्यालय अधीक्षक राजू जाधव, प्रशासकीय अधिकारी गणेश मुळे, अंकित बेलोकार तसेच इतर नगरपालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या आरक्षणामुळे आगामी निवडणुकीत राजकीय संघर्ष आणि उमेदवार निवडीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे, तर ना.मा.प्र प्रवर्गातील महिलांसाठी या निर्णयामुळे विशेष संधी उपलब्ध झाल्या आहेत.

