Villagers rushed to Dongaon :लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता डोणगाव पोलिस स्टेशनच्या वतीने “रन/वॉक फॉर युनिटी” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

‘रन/वॉक फॉर युनिटी’ उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग
डोणगाव : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता डोणगाव पोलिस स्टेशनच्या वतीने “रन/वॉक फॉर युनिटी” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी ठाणेदार अमरनाथ नागरे, माजी कृषी सभापती राजेंद्र पळसकर, माजी सरपंच संजय आखाडे, संत गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष डॉ. गजानन उल्हामाले, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार आणि पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.वॉक फॉर युनिटी अंतर्गत सहभागी मंडळींनी डोणगाव पोलिस स्टेशनपासून विठ्ठल-रुखमाई प्राथमिक शाळेपर्यंत चालत जाऊन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. त्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस कुमकुम तिलक करून पूजन करण्यात आले आणि सर्वांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली.या उपक्रमामुळे गावात ऐक्य, देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश प्रभावीपणे पोहोचला.

