12 villages aggressively : अकोला जिल्ह्यातील झरंडी, वसाली, उमरवाडी, गोंधळवाडी, वनदेव, पांगरताटी, सती, आसोला, पिंपरडोळी, पळसखेड, पाडसिंगी या गावांचा डोंगरी विभागात समावेश करण्याची मागणी १० ऑक्टोबर २०२५ राेजी जिल्हाधिकारी अकोला, खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.

१५ दिवसांत निर्णय न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा
राहुल साेनाेने
वाडेगाव : अकोला जिल्ह्यातील झरंडी, वसाली, उमरवाडी, गोंधळवाडी, वनदेव, पांगरताटी, सती, आसोला, पिंपरडोळी, पळसखेड, पाडसिंगी या गावांचा डोंगरी विभागात समावेश करण्याची मागणी १० ऑक्टोबर २०२५ राेजी जिल्हाधिकारी अकोला, खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले की, या गावांचा डोंगरी विभागात समावेश करून घेण्यासाठी १५ दिवसांच्या आत समिती गठित करून सर्वेक्षण व प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावी. प्रशासनाने या कालावधीत दखल घेतली नाही तर ॲड. महेश गजाननराव शिंदे हे गावकऱ्यांसह आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला.
निवेदन देताना गजानन निमकाळे (सरपंच पळसखेड), गजानन राठोड (उपसरपंच वसाली), समाधान जाधव (सरपंच झरंडी), शांताराम झ्याटे (ग्रा.पं. सदस्य वसाली), रामराव डाखोरे, सोपान डाखोरे, अण्णासाहेब ताजणे, डॉ. ताजणे (पिंपरडोळी), गजानन धानोरे, अंबादास राठोड, शिवशंकर भाऊ (पोलीस पाटील पांगरताटी) तसेच इतर प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डोंगरी भागातील गावांना शासनाच्या विशेष योजना, अनुदाने व विकास निधी मिळावा, यासाठी स्थानिकांनी एकत्रितपणे पुढाकार घेतला आहे. ग्रामस्थांमध्ये या प्रश्नावर तीव्र असंतोष असून, लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

