Various programs : येथील ग्रामपंचायतमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन, महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या संयुक्त कार्यक्रमाला गावातील सरपंच लता डाबेराव, उपसरपंच योगेश बढे उपस्थित होते तर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी बबन सदांशिव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत मनोगत व्यक्त केले.

पळसो बढे : येथील ग्रामपंचायतमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन, महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या संयुक्त कार्यक्रमाला गावातील सरपंच लता डाबेराव, उपसरपंच योगेश बढे उपस्थित होते तर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी बबन सदांशिव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरूवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताची माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन करण्यात आली. यावेळी ग्रा. पं. सदस्य बाळकृष्ण लाळे, आरती धोत्रे, पंचशीला इंगळे, लिला टोबरे, रेखा जामनिक, गोपाल चौधरी, प्रविणइंगळे, योगिता शेंडे, प्रतिभा चव्हाण, वनिता रेवस्कार, प्रप्ल बढे आदी मंचावर उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी बबन
सदांशिव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मातराची घोषणा का केली, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धम्म का स्वीकारला, धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणजे काय, तो का साजरा केला जातो. धर्मांतराचा मूळ उद्देश काय आदी विषयांबाबत उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर उपसरपंच योगेश बढे यांनी भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. भावेश धोत्रे यांनी समारोपात धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट केले. तसेच गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाबरोबरच शास्त्रीजींच्या ‘जय जवान जय किसान’ या घोषणेची आजच्या काळातील गरज उपस्थितांना पटवून दिली. संचालन व आभार सारनाथ वानखडे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्रम्हदेव इंगळे, शिलवंत इंगळे, राहुल तायडे, कैलास डाबेराव, देवानंद तायडे यांनी परिश्रम घेतले.

