Vanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर तसेच युवा नेते सुजात दादा आंबेडकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट आणि व्हिडीओ सिरीज व्हायरल करण्यात आल्याने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी ‘द पॉलिटिकल आर्किटेक्ट कंपनी’, ‘विदर्भाचं राजकारण’, ‘महाराष्ट्राचा विश्वास’, ‘देवाभाऊ’ आणि ‘वर्धा लाईव्ह’ या फेसबुक पेजच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधातील पोस्ट व्हायरल; बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
बोरगाव मंजू : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर तसेच युवा नेते सुजात दादा आंबेडकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट आणि व्हिडीओ सिरीज व्हायरल करण्यात आल्याने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी ‘द पॉलिटिकल आर्किटेक्ट कंपनी’, ‘विदर्भाचं राजकारण’, ‘महाराष्ट्राचा विश्वास’, ‘देवाभाऊ’ आणि ‘वर्धा लाईव्ह’ या फेसबुक पेजच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
ही तक्रार भारतीय न्याय संहिता कलम 299, 196, 357 तसेच आय.टी. ॲक्ट आणि अतिपीडित अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी ॲक्ट) अंतर्गत गुन्हे नोंदवावेत, अशा मागणीसह देण्यात आली आहे. या वेळी मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सोशल मीडियावर काही समाजकंटकांकडून ॲड. आंबेडकर व सुजात आंबेडकर यांच्या विरोधात भावना दुखविणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या पोस्ट व्हायरल करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी, अकोला पूर्व तालुकाध्यक्ष किशोर जामणिक आणि बोरगाव मंजू सर्कलच्या माजी जिल्हा परिषद सदस्या नीताताई संदीप गवई यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या वेळी वंचित बहुजन आघाडीचे माजी पंचायत समिती सभापती वसंतराव नागे, मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते हाजी अनिस, अनवी सरपंच प्रदीप नवलकार, बीरसिंगपूर सरपंच महेंद्र घरडे, सुशिल मोहोड, इरफान पटेल, देवानंद गवई, योगेश तायडे, राजू खांडेकर, समिउल्ला शाह, दादाराव सुलताने, करीमभाई, मेहबूब शाह, नितेश गवई, बुद्धदास गवई, योगेश बागडे, भारत गवई, शोभाताई वानखडे, रंजनाताई गावंडे, इकबालभाई देशमुख, अत्तुभाई, सनाउल्ला शाह, नवेदभाई, अरुण तायडे, मिलिंद मोहोड, बंडु गावंडे, प्रमोद समुद्रे, नम्रताई आठवले, रुपेश वानखडे, म. अशफाक, रोहित जामणिक, अक्षय वानखडे, मनोज वानखडे, रोशन गवई, प्रविण इंगळे, सौरव तायडे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा – नीताताई गवई
“आमचे श्रद्धास्थान असलेले ॲड. बाळासाहेब आंबेडकर आणि युवा नेते सुजात दादा आंबेडकर यांच्या विरोधात काही वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून खोट्या आणि अपमानास्पद पोस्ट व्हायरल करून चुकीचा संदेश पसरवला आहे. अशा व्यक्तींवर तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई करावी; अन्यथा वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्या नीताताई संदीप गवई यांनी पोलिस ठाण्यात निवेदन देताना पत्रकारांशी बोलताना दिला.

