stole a tractor-trolley : बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी धाडस करत ट्रॅक्टर व ट्रॉली लंपास केल्याची घटना घडली आहे. पळसो बढे येथील शेतकरी विशाल रेवसकर यांच्या घरासमोर उभा असलेला ट्रॅक्टर (क्रमांक MH 30 AZ 8192) आणि ट्रॉली (क्रमांक MH 28 E 117) अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना गुरुवारी (दि. ६ नोव्हेंबर) सकाळी उघडकीस आली.

बोरगाव मंजू : बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी धाडस करत ट्रॅक्टर व ट्रॉली लंपास केल्याची घटना घडली आहे. पळसो बढे येथील शेतकरी विशाल रेवसकर यांच्या घरासमोर उभा असलेला ट्रॅक्टर (क्रमांक MH 30 AZ 8192) आणि ट्रॉली (क्रमांक MH 28 E 117) अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना गुरुवारी (दि. ६ नोव्हेंबर) सकाळी उघडकीस आली.
फिर्यादीनुसार, विशाल रेवसकर यांनी बुधवारी (दि. ५ नोव्हेंबर) सायंकाळी शेतातील कापसाची गाठोडी आणल्यानंतर सुमारे चार लाख रुपये किंमतीचा ट्रॅक्टर आणि एक लाख रुपये किंमतीची ट्रॉली घराच्या मागील देविकार यांच्या घरासमोर उभी केली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहिले असता दोन्ही वाहने जागेवर आढळली नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक मनोज उघडे व हेडकॉन्स्टेबल उमेश पुरी यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले. पोलिसांनी परिसर पिंजून काढत अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मनोज उघडे पुढील तपास करीत आहेत.दरम्यान, ट्रॅक्टर-ट्रॉली चोरीच्या या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

