Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद 

Two-wheeler theft : शहरातील दुचाकी चोरी प्रकरणाचा चिखली पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावला असून आरोपीला मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. डी.बी. पथकाने गुप्त माहितीच्या आधारे जालना जिल्ह्यात धाड टाकत चोरीस गेलेली हीरो HF डिलक्स दुचाकी जप्त केली. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Two-wheeler theft

चिखली : शहरातील दुचाकी चोरी प्रकरणाचा चिखली पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावला असून आरोपीला मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. डी.बी. पथकाने गुप्त माहितीच्या आधारे जालना जिल्ह्यात धाड टाकत चोरीस गेलेली हीरो HF डिलक्स दुचाकी जप्त केली. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

२० जानेवारी २०२६ रोजी फिर्यादी यांनी आपली हीरो कंपनीची HF डिलक्स (क्रमांक MH २८ AW २५२१) दुचाकी चिखली येथील विश्रामगृह परिसरात उभी केली होती. काही वेळाने परत आल्यानंतर वाहन जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिसरात शोध घेतला; मात्र दुचाकीचा पत्ता लागला नाही. अखेर २७ जानेवारी २०२६ रोजी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध अप. क्र. ७६/२०२६, कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.

पोलीस निरीक्षक भुषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील भारज बु. येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पथकाने तत्काळ तेथे जाऊन संत सावता माळी भवन परिसरात पाहणी केली असता चोरीस गेलेली HF डिलक्स दुचाकी एका घरासमोर उभी आढळली.

चौकशीत सदर वाहन कृष्णा पवार वापरत असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी कृष्णा आत्माराम पवार (वय २४, रा. उमरखेडा ता. भोकरदन, सध्या रा. भारज बु. ता. जाफ्राबाद, जि. जालना) यास ताब्यात घेतले. वाहनाच्या चेसिस व इंजिन क्रमांकाची पडताळणी केली असता ते चोरीस गेलेलेच वाहन असल्याचे निष्पन्न झाले. पुढील चौकशीत आरोपीने दुचाकी चोरीची कबुली दिली.आरोपी व जप्त मुद्देमाल चिखली पोलीस ठाण्यात आणण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ कैलास चतरकर व पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर शिंदे करीत आहेत.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक भुषण गावंडे यांच्या नेतृत्वात पोउपनि शरद भागवतकर, डी.बी. पथकाचे सफौ राजेंद्र काळे, पोना अमोल गवई, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत धंदर, अजय इटावा, पंढरीनाथ मिसाळ, राहुल पायघन, निलेश सावळे, विशाल वायाळ, महिला पोलीस कॉन्स्टेबल रुपाली उगले यांच्यासह पथकातील अधिकाऱ्यांनी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top