Two motorcycles : दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने सरंबा येथील एक युवक ठार तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना चिखली शहरातील देऊळगाव राजा रोडवरील मीरा लॉन्ससमोर ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्निल दिनकर चेके (वय २७, रा. सरंबा ता. देऊळगाव राजा) असे मृतक युवकाचे नाव आहे.

चिखली शहरातील मीरा लॉन्ससमोरील घटना; दुचाकी चालकावर गुन्हा दाखल
चिखली: दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने सरंबा येथील एक युवक ठार तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना चिखली शहरातील देऊळगाव राजा रोडवरील मीरा लॉन्ससमोर ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्निल दिनकर चेके (वय २७, रा. सरंबा ता. देऊळगाव राजा) असे मृतक युवकाचे नाव आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्निल दिनकर चेके हा आपला मित्र शंकर प्रसाद याच्यासह दुचाकी क्रमांक BM-28-BM-5870 वरून सरंबा गावाकडे जात होता. दरम्यान, देऊळगाव राजा रोडवरील मीरा लॉन्ससमोर समोरून आलेल्या MH-28-Z-8436 या क्रमांकाच्या दुचाकीच्या चालकाने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात स्वप्निल चेके गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून अपघातातील आरोपी चालक देखील जखमी झाला आहे.
या घटनेप्रकरणी संतोष मधुकर पडघान (वय ४०, रा. भालगाव ता. चिखली) यांनी दिलेल्या तक्रारीवरून चिखली पोलीस ठाण्यात कायमी अप क्रमांक १०६/२०२६ नोंदविण्यात आला. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०६(१), २८१, १२५(अ) व ३२४(४)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ७.०० ते ७.१५ वाजण्याच्या दरम्यान घडली असून तक्रार ६ फेब्रुवारी रोजी पहाटे २.०१ वाजता नोंदविण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास गोपाळराव चतरकर (पोलीस ठाणे चिखली) यांच्याकडे सोपविण्यात आला असून गुन्हा दाखल अधिकारी म्हणून महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यकला म्हस्के यांनी कार्यवाही केली आहे. दरम्यान, या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे.

