Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

  Two accused  :वृद्धेला चाकूचा धाक दाखवून लुटणारे दोन आरोपी गजाआड

Two accused  :साखरखेर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हनवतखेड येथे ९२ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवत दागिने लुटल्याची धक्कादायक घटना २९ जानेवारीच्या रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून एका महिलेसह आणखी दोन आरोपी फरार आहेत.

Two accused 

महिलेसह दोन आरोपी फरारच: हनवतखेड येथे घडली होती घटना, आठ तोळे सोने केले होते लंपास

अशोक इंगळे

साखरखेर्डा  : साखरखेर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हनवतखेड येथे ९२ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवत दागिने लुटल्याची धक्कादायक घटना २९ जानेवारीच्या रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून एका महिलेसह आणखी दोन आरोपी फरार आहेत.

प्राप्त माहितीनुसार, हनवतखेड येथील सुमन श्रीराम चव्हाण (वय ९२) या २९ जानेवारी रोजी रात्री घरी झोपेत असताना तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील किचनरूमचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यांनी झोपेत असलेल्या वृद्ध महिलेच्या हातातील, कानातील, नाकातील व गळ्यातील दागिने काढण्यास सुरुवात केली. नाकातील दागिना काढताना महिलेची जाग आली असता चोरट्यांनी लेनकटरच्या चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या महिलेने “तुम्हाला जे हवे ते घ्या, पण मला मारू नका,” अशी विनवणी केली.

चोरट्यांनी सन २००५–०६ मध्ये खरेदी केलेले सुमारे आठ तोळे सोन्याचे दागिने लुटून नेले. यात दोन्ही हातातील सुमारे पाच तोळ्यांच्या दोन सोन्याच्या बांगड्या, गळ्यातील दोन तोळ्यांची पोत व कानातील एक तोळ्याचे झुमके (टॉप्स) यांचा समावेश असून त्यावेळच्या बाजारभावानुसार किंमत सुमारे ५६ हजार रुपये होती. सध्याच्या बाजारभावानुसार या दागिन्यांची किंमत अंदाजे १३ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. नथ न निघाल्याने ती चोरट्यांनी नेली नाही. तसेच घरातील ३२ इंची टीव्ही व रिसिव्हर बाहेर नेऊन ठेवण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी अनिल चव्हाण यांनी साखरखेर्डा पोलिसांत तक्रार दाखल केली. ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला असता संशयितांचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी करण एकनाथ वंजारे (रा. खेर्डा, ता. मालेगाव, जि. वाशीम) व मनोज मोहन इंगळे (रा. सुकंडा, ता. मालेगाव, जि. वाशीम) या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एका महिलेसह आणखी दोन आरोपी अद्याप फरार आहेत. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक केलेला करण वंजारे हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top