Tulsabai Kaval School: तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पातुर येथील दोन खेळाडूंनी विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी करत राज्यस्तरावर निवड मिळवून पातुर तालुक्याचा गौरव वाढविला आहे.

पातुरच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा!
संजय गोतरकर
पातुर : तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पातुर येथील दोन खेळाडूंनी विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी करत राज्यस्तरावर निवड मिळवून पातुर तालुक्याचा गौरव वाढविला आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत उपसंचालक (क्रीडा व युवक सेवा) अमरावती विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय शालेय क्रीडा स्पर्धा १२ ऑक्टोबर २०२५ रोजी अमरावती येथे पार पडल्या. या स्पर्धेत तुळसाबाई कावल विद्यालयातील वयोगट १७ मध्ये ११० किलो वजन गटातील जयसिंग गोकुळ हरणे आणि वयोगट १७ मध्ये ६५ किलो वजन गटातील कुमारी अक्षरा अनिल गवई यांनी कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश संपादन करत राज्यस्तरावर आपले स्थान पक्के केले.
संस्थेच्या सचिव स्नेह प्रभादेवी गहिलोत यांनी सांगितले की, “सातत्य आणि नियमितपणा हे यशाचे खरे गमक आहे. या दोन्ही गुणांचा सुंदर संगम अक्षरा अनिल गवई हिच्या कामगिरीत दिसून येतो. तिची मेहनत, शिस्त आणि चिकाटी सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.”
राज्यस्तरावर अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व या दोन्ही खेळाडूंकडून करण्यात येणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल बेरार एज्युकेशन सोसायटी, पातुरचे व्यवस्थापक विजयसिंह गहिलोत, सचिवद स्नेह प्रभादेवी गहिलोत, प्राचार्य अंशुमान सिंह गहिलोत, उपप्राचार्य एस. बी. चव्हाण, उपमुख्याध्यापिका आर. एस. ढेंगे, पर्यवेक्षिका पी. एम. कारस्कर, पर्यवेक्षक एस. आर. मुखाडे, क्रीडा शिक्षक एस. आर. खाडे व डी. एम. राणे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

