Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Triple accident: मुर्तिजापूर-दर्यापूर मार्गावर तिहेरी अपघात, एक ठार, ९ प्रवाशी गंभीर जखमी

Triple accident: मुर्तिजापूर-दर्यापूर मार्गावर पायटांगी बसथांब्याजवळ झालेल्या तिहेरी भीषण अपघातात एक जण ठार तर नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि. २३) रात्री आठच्या दरम्यान घडली. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.

accident

अकोला जिल्ह्यात अपघातांची मालिका कायम
संजय तायडे
बोरगाव मंजू  :  मुर्तिजापूर-दर्यापूर मार्गावर पायटांगी बसथांब्याजवळ झालेल्या तिहेरी भीषण अपघातात एक जण ठार तर नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि. २३) रात्री आठच्या दरम्यान घडली. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुर्तिजापूर कडून दर्यापूर कडे ट्रॅक्टर क्रमांक एमएच २५ १९४८जात हाेता. यावेळी पाठीमागून प्रवासी वाहु कार क्रमांक एमएच 30 बी एल ७६०० ने समोरच्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टरवर धडकली,तर रस्त्याच्या कडेला तिन पलट्या घेत कोसळली. याच दरम्यान दर्यापूर कडून प्रवासी वाहतूक करणारा ऑटो क्रमांक एमएच २७ बी डब्ल्यू ८०७५ कारला धडकला.  या तिहेरी अपघातात एक अनाेळखी प्रवासी ठार झाला तर ९ प्रवासी गंभीर जखमी झाले, दरम्यान घटनेची माहिती मिळताच मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे एएस आय वानखडे मेजर,एएस आय दिपक कानडे, हेडकॉन्स्टेबल संजय खंडारे, ज्ञानेश्वर लटके, गणेश ठाकरे,खाडे मेजर सह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे काही काळ मार्गावर वाहतूक विस्कळित झाली होती, पोलिसांनी सुरळीत केली,तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी लोकांनी मदत केली, नेमका अपघात कसा झाला हे मात्र समजू शकले नाही, पुढील तपास मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top