Tripitaka Dhamma Conference: भगवान बुद्धांच्या उपदेशांचा संचय म्हणजे त्रिपिटक. हा उपदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने दि बुद्धिस्ट ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट आणि समस्त उपासिका संघ, बुलढाणा यांच्या वतीने रविवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता राधा गोविंद सेलिब्रेशन हॉल (एडेड हायस्कूलजवळ, बुलढाणा) येथे त्रिपिटक धम्म संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय स्तरावरील भिक्खू संघाची उपस्थिती लाभणार आहे.

बुलढाणा : भगवान बुद्धांच्या उपदेशांचा संचय म्हणजे त्रिपिटक. हा उपदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने दि बुद्धिस्ट ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट आणि समस्त उपासिका संघ, बुलढाणा यांच्या वतीने रविवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता राधा गोविंद सेलिब्रेशन हॉल (एडेड हायस्कूलजवळ, बुलढाणा) येथे त्रिपिटक धम्म संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय स्तरावरील भिक्खू संघाची उपस्थिती लाभणार आहे.
दरवर्षी महाबोधी महाविहार, बोधगया येथे पवित्र बोधीवृक्षाखाली संपूर्ण जगभरातून बौद्ध भिक्खू व अनुयायी उपस्थित राहून त्रिपिटकाचे सांगायन (पठण) करतात. यावर्षी या कार्यक्रमाचा मान भारतातील बौद्ध भिक्खू, उपासक व उपासिकांना प्राप्त झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर बुलढाण्यातील या धम्म संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संमेलनास त्रिपिटका चॅंटिंग कौन्सिलचे जनरल सेक्रेटरी भंते विनय रक्खिता महाथेरो यांच्या विशेष उपस्थितीत, तसेच भंते ज्ञानरक्षित थेरो, भंते करुणानंद थेरो, भंते यश थेरो, भंते राहूलो, भिक्खुनी शाक्य धम्मदिना व आंतरराष्ट्रीय विश्व संघाच्या मान्यवर भिक्षुंच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. विशेष उपस्थिती म्हणून आवाज इंडिया टीव्हीचे संचालक अमन कांबळे आणि अप्पर जिल्हाधिकारी रमेश घेवंदे यांची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन समस्त उपासिका संघ, बुलढाणा तसेच मुख्य आयोजक कुणाल पैठणकर, प्रा. राजेश खंडेराव, सुरेश डावरे, ॲड. राहुल दाभाडे, आत्माराम चौतमल, भिकाजी मेढे, प्रशांत बोर्डे, मोनिका साळवे, सारिका घेवंदे, सुरेश सरकटे, प्रा. प्रदीप जाधव, संजय जाधव, सुरेश घेवंदे, गणेश झोटे, प्रल्हाद कांबळे, पद्माकर डोंगरे आणि इतर पदाधिकारी यांनी केले आहे. कार्यक्रमास सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

