Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Three tipper trucks :तीन टिप्पर पकडले; १८ ब्रास रेतीसह ९१ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त

Three tipper trucks : रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मेहकर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने २० जानेवारी रोजी मोठी कारवाई करत १८ ब्रास रेतीसह तीन टिप्पर जप्त केले. दोन वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेल्या या कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण ९१ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

Three tipper trucks

रेती माफियांवर मेहकर एसडीपीओंच्या पथकाची धडक कारवाई

मेहकर : रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मेहकर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने २० जानेवारी रोजी मोठी कारवाई करत १८ ब्रास रेतीसह तीन टिप्पर जप्त केले. दोन वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेल्या या कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण ९१ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे हे २० जानेवारी रोजी आपल्या पथकासह गस्त घालत असताना रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे फर्दापूर शिवारात मेहकर–जानेफळ रोडवरील रायबा हॉटेलजवळ नाकाबंदी करण्यात आली. यावेळी गौण खनिज रेती (वाळू) चोरी करून वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मोठी पोलीस कारवाई करण्यात आली.
या कारवाईत पोलिसांनी दोन टिप्पर, रेतीचा साठा व मोबाईल फोन असा ५१ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये टाटा कंपनीचा टिप्पर क्र. MH-28 BB 9109 (किंमत ₹२५ लाख), त्यामधील अंदाजे ६ ब्रास वाळू (₹४२ हजार), ओपो व सॅमसंग कंपनीचे दोन मोबाईल (₹१० हजार), तसेच टाटा कंपनीचा दुसरा टिप्पर क्र. MH-28 BB 9181 (किंमत ₹२५ लाख), त्यातील ६ ब्रास वाळू (₹४२ हजार) व ओपो व व्हिवो कंपनीचे दोन मोबाईल (₹१० हजार) असा मुद्देमाल समाविष्ट आहे. या प्रकरणी टिप्पर चालक, कंडक्टर व मालकांविरुद्ध पोलीस स्टेशन मेहकर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जानेफळ रोडवर बनावट परवान्यांद्वारे रेती वाहतूक
दरम्यान, ग्राम गोमेधर शिवारात जानेफळ–मेहकर रोडवर दुसरी कारवाई करण्यात आली. येथे आरोपी शासनाने निर्गमित केलेल्या वैध परवान्यामध्ये पेनाने खोडाखोड करून बनावटरीत्या वापर करत असल्याचे आढळून आले. या कारवाईत पोलिसांनी
टिप्पर क्र. MH-28 BY 5979 (किंमत ₹४० लाख) व अंदाजे ६ ब्रास वाळू (₹४२ हजार) असा ४० लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस स्टेशन जानेफळ येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही कारवायांमध्ये मिळून एकूण ९१ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे व अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजिनाथ मोरे (पो.स्टे. जानेफळ), पोलीस उपनिरीक्षक गणेश कड,पो.हे.कॉ. डिगांबर चव्हाण, सुनील देशमुख, उमेश घुगे, पो.कॉ. किशोर बोरे, आकाश काळदाते, तसेच चालक पो.कॉ. सलीम गवळी यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.अवैध रेती वाहतुकीविरोधात अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहणार, असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top