molesting : तालुक्यातील गिरोली बु. शेतशिवारात एका महिलेशी गैरवर्तन करून तिच्यावर मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. ही घटना १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली.
या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मदन जनार्धन झिने याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४, ११८(१) व ३५१(२)(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देऊळगाव राजा : तालुक्यातील गिरोली बु. शेतशिवारात एका महिलेशी गैरवर्तन करून तिच्यावर मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. ही घटना १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली.
या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मदन जनार्धन झिने याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४, ११८(१) व ३५१(२)(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शेतात काम करत असताना पाणी भरण्यासाठी शेजारच्या शेतात गेली असता आरोपीने वाईट उद्देशाने तिचा उजवा हात पकडला. महिलेने आरडाओरडा करून स्वतःची सुटका करून घेतली असता, “घडलेली बाब कोणाला सांगितल्यास तुझ्या नवऱ्याला जीवे मारीन,” अशी धमकी आरोपीने दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
घरी परतल्यानंतर महिलेने घडलेली घटना वडिलांना सांगितली. त्यानंतर वडील आरोपीला जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपीने त्यांनाही ढकलाढकली केली तसेच फिर्यादीच्या आईच्या डोक्यात काठीने मारहाण केली. यावेळी फिर्यादीचे केस ओढून तिलाही लोटून दिल्याचा आरोप आहे. फिर्यादीच्या तोंडी निवेदनासह वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे गुन्हा नोंदविण्यात आला.सदर गुन्हा महिला पोलीस कर्मचारी निलीमा जाधव यांनी दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय गोरे करीत आहेत.

