Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Milind Wankhade : संविधान सन्मान महासभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा ;  मिलिंद वानखडे यांचे आवाहन 

Milind Wankhade : भारतीय नागरिकांना माणूस म्हणून जगण्याचे मूलभूत अधिकार बहाल करणाऱ्या भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ, संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “भारताचे संविधान हाच आमचा अभिमान” या ब्रीदवाक्याखाली २५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर (मुंबई) येथे संविधान सन्मान महासभेचे आयोजन करण्यात आले आहे.

Milind Wankhede'

 बुलढाणा : भारतीय नागरिकांना माणूस म्हणून जगण्याचे मूलभूत अधिकार बहाल करणाऱ्या भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ, संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “भारताचे संविधान हाच आमचा अभिमान” या ब्रीदवाक्याखाली २५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर (मुंबई) येथे संविधान सन्मान महासभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या ऐतिहासिक सभेला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख श्रद्धेय बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच देशभरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार असून, विविध जाती-समूह आणि बहुजन समाजाला एकत्र आणण्याचा या महासभेचा उद्देश आहे.

प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार बुलढाणा शहरातील सर्व बहुजनवादी, लोकशाहीवादी तसेच संविधानाचा आदर करणाऱ्या सर्व जातीधर्मातील नागरीकांनी हजारोंच्या संख्येने या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा शहराध्यक्ष मिलिंद वानखेडे यांनी केले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, “ही सभा ऐतिहासिक ठरणार असून आपण सर्वांनी तिचे साक्षीदार व्हावे. संविधानाचा सन्मान आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top