Thieves in Lonigawli :डोणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील लोणीगवळी गावात अज्ञात चोरट्यांनी ११ नोव्हेंबरच्या रात्री बंद असलेली चार घरे फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोरट्यांनी हजारो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.विशेष म्हणजे, चोरीदरम्यान श्याम काळे यांच्या घराची कडी बाहेरून लावण्यात आली होती.

डोणगाव : डोणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील लोणीगवळी गावात अज्ञात चोरट्यांनी ११ नोव्हेंबरच्या रात्री बंद असलेली चार घरे फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोरट्यांनी हजारो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.विशेष म्हणजे, चोरीदरम्यान श्याम काळे यांच्या घराची कडी बाहेरून लावण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणीगवळी येथील माधव कल्याणकर, पिंटू कल्याणकर, अरविंद अवचार आणि रमेश जागृत यांची घरे त्या रात्री बंद होती. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरफोड्या केल्या. ही घटना १२ नोव्हेंबरच्या सकाळी उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष मिलिंद अवचार आणि प्रा. विजय जाग्रुत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्रशांत पाटील यांनी तत्काळ डोणगाव पोलीस स्टेशनला भेट देऊन ठाणेदार अमरनाथ नागरे यांना माहिती दिली. तसेच, लोणीगवळी परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी आणि बिट जमादार संजय घिके यांची बदली करून दुसरा जमादार नेमावा, अशी मागणी केली.
वृत्त लिहीपर्यंत या घटनेबाबत डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झालेली नव्हती.

