Theft at grocery store in Wadegaon: इंदिरानगर परिसरातील मोहम्मद मकसूद मोहम्मद युसुफ यांच्या किराणा दुकानात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून किराणामालासह रोख रक्कम असा एकूण अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना ७ नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडली.

राहुल सोनोने
वाडेगाव : इंदिरानगर परिसरातील मोहम्मद मकसूद मोहम्मद युसुफ यांच्या किराणा दुकानात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून किराणामालासह रोख रक्कम असा एकूण अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना ७ नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, युसुफ हे रोजच्या प्रमाणे सकाळी दुकान उघडण्यासाठी गेले असता, दुकानाचा टाळा उघडून आत गेल्यावर त्यांना दुकानातील माल सैरावैरा अवस्थेत पडलेला दिसला. वरच्या बाजूच्या खिडकीतील कापड काढून चोरट्यांनी आत प्रवेश करून किराणामाल व रोख रक्कम चोरी केली असल्याचे दिसून आले.
घटनेची माहिती मिळताच वाडेगाव पोलिस चौकीचे बिटजमदार ताले व भरत गिरी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास बाळापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश झोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संभाजी हिवाळे व पोलीस हेडकॉन्स्टेबल ताले तसेच भरत गिरी करीत आहेत.

