Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

voting percentage increased : दुपारनंतर वाढला मतदानाचा टक्का, दीड वाजेपर्यंत 34.58 टक्के मतदान

voting percentage increased : जिल्हयातील दहा नगर पालिकांसाठी सकाळी 7.30 वाजता मतदानास प्रारंभ झाला. सकाळी थंडी असल्याने मतदार घराबाहेर पडलेच नाही . त्यामुळे सकाळी 7.30 ते 9.30 दरम्यान केवळ 8.09 टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मतदानाची टक्केवारी वाढली. दिड वाजेपर्यंत 34.58 टक्के मतदानाची नोंद झाली होती.

The voting percentage increased

थंडीमुळे दहाही नगर पालिकांमध्ये संथ सुरूवात : चिखलीत एका मतदान केंद्रावर गोंधळ

बुलढाणा : जिल्हयातील दहा नगर पालिकांसाठी सकाळी 7.30 वाजता मतदानास प्रारंभ झाला. सकाळी थंडी असल्याने मतदार घराबाहेर पडलेच नाही . त्यामुळे सकाळी 7.30 ते 9.30 दरम्यान केवळ 8.09 टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मतदानाची टक्केवारी वाढली. दिड वाजेपर्यंत 34.58 टक्के मतदानाची नोंद झाली होती.
जिल्ह्रयातील 11 नगर पालिकांसाठी निवडणुक जाहीर झाली होती. मतदानाला एक दिवस शिल्लक असताना देऊळगाव राजा नगर पालिकेची निवडणुक स्थगित करण्यात आली. त्यामुळे आता 10 नगर पालिकांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले. यामध्ये सकाळच्या सत्रात मतदानाची गती संथ होती. थंडीमुळे मतदार घराबाहेर पडलेच नाही. सकाळी 9.30 नंतर मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली. सकाळी 11.30 पर्यंत 19.79 टक्के मतदान झाले होते. मतदानादरम्यान बुलढाण्यात काही मतदान केंद्रावर बोगस मतदार आढळल्याने खळबळ उडाली होती. तसेच एका मतदान केंद्रावर तर काँग्रेसच्या उमेदवाराने बोगस मतदारास चोप दिला. तसेच चिखलीतील एका मतदान केंद्रावर गोंधळ झाला होता. मतदान केंद्राधिकार्याने मात्र असा कुठलाही गोंधळ झाला नसल्याचे स्पष्टीकरण दिले.
जिल्हयात दहाही नगर पालिकांसाठी दीड वाजेप र्यंत 34. 58 टक्के मतदान झाले. यामध्ये बुलढाणा- 26.25 %, चिखली – 27.91 % , जळगाव जामोद – 43.25 %, खामगाव – 33.97 %, लोणार – 34.96 %, मलकापूर – 40.38 % मेहकर – 39.22%, नांदुरा – 36.35 %, शेगाव – 34.98 % आणि सिंदखेड राजा – 39.81 टक्के मतदानाची नोंद झाली होती.

election

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी प्रभाग क्रमांक 10 मधील सरस्वती विद्यालयातील मतदान केंद्रावर भेट देत इतर मतदारांप्रमाणे रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला.
मतदानानंतर त्यांनी नागरिकांना लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी निर्भयपणे, पारदर्शकपणे आणि उत्साहाने मतदान करण्याचे आवाहन केले. मतदानाचा हक्क बजावताना कोणतीही चूक, गैरप्रकार किंवा बनावटपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा कडक इशाराही दिला.जिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले की, प्रशासनाच्या वतीने मतदान प्रक्रिया शांततेत, सुव्यवस्थित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. त्यांनी सर्व नागरिकांना लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.

पिंक मतदान केंद्राला भेट

बुलढाणा नगरपरिषद क्षेत्रातील महिलांसाठी जिल्हा प्रशासनाने विशेष पिंक मतदान केंद्र सुरु केले होते. या केंद्रात मतदान केंद्र अध्यक्षापासून सर्व कर्मचारी हे महिला वर्ग नियुक्त करण्यात आले होते. या पिंक मतदान केंद्राला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top