Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

The seized JCB was stolen : जप्त केलेली जेसीबी चक्क तहसीलच्या आवारातूनच पळविली, तहसीलदारांनी पाठलाग करून केली पुन्हा जप्त

The seized JCB was stolen : बेकायदेशीर रेती उत्खननाच्या संशयावरून जप्त करून सिंदखेडराजा तहसील कार्यालयाच्या आवारात सुरक्षित उभी करून ठेवलेली बिना नंबरची जेसीबी मशीन दोन आरोपींनी संगनमत लंपास केल्याची घटना 20 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली.दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सिंदखेड राजाचे तहसीलदार अजित दिवटे यांनी पोलिसांच्या मदतीने जेसीबीचा पाठलाग करून जप्त केली. तहसीलच्या आवारातूनच जेसीबी लंपास करण्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

The seized JCB was stolen
सिंदखेडराजा: बेकायदेशीर रेती उत्खननाच्या संशयावरून जप्त करून सिंदखेडराजा तहसील कार्यालयाच्या आवारात सुरक्षित उभी करून ठेवलेली बिना नंबरची जेसीबी मशीन दोन आरोपींनी संगनमत लंपास केल्याची घटना 20 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली.दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सिंदखेड राजाचे तहसीलदार अजित दिवटे यांनी पोलिसांच्या मदतीने जेसीबीचा पाठलाग करून जप्त केली. तहसीलच्या आवारातूनच जेसीबी लंपास करण्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
ताडशिवनी गावात बेकायदेशीर रेती (वाळू) उत्खनन करण्याच्या उद्देशाने वापरली जात असल्याची संशयावरून, तहसील कार्यालयाच्या पथकाने विना क्रमांकाची जेसीबी मशीन ताब्यात घेतली होती. पुढील कायदेशीर कारवाई होईपर्यंत ही जेसीबी तहसील कार्यालयाच्या आवारात उभे करण्यात आले होते. गुरुवार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता तहसील कार्यालय सिंदखेडराजाच्या आवारातून आरोपीने जेसीबी पळून घेऊन निघाला असताना तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याला कळाले. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अजित दिवटे व पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप यांनी पाठलाग करून मेहकर रोड जिजामाता पेट्रोल पंपानजीक जेसीबीसह जेसीपी चालकास पकडले. तहसील कार्यालयाचे शिपाई अनंता विठोबा वाठोरे वय 40 यांनी या प्रकरणी सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, २ आरोपींनी संगनमत करून जेसीबी चोरून नेली . समाधान नारायण मोरे, शुशिल प्रभाकर शिंदे रा. ताडशिवनी या आरोपीनी पूर्वनियोजित कटरचून, जप्त केलेली शासकीय मालमत्ता चोरून नेण्याच्या उद्देशाने पळवल्याचे फिर्यादीत नमूद आहे. फिर्यादीनंतर सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला.या गंभीर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top