Varsha Kalyankar: नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद हा एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. निपाणा येथे झालेली शिक्षण परिषद खरोखरच सर्वांगसुंदर झाली, असे गौरवोद्गार अकोला पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी वर्षा कल्याणकर यांनी काढले.

बोरगाव मंजू : नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद हा एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. निपाणा येथे झालेली शिक्षण परिषद खरोखरच सर्वांगसुंदर झाली, असे गौरवोद्गार अकोला पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी वर्षा कल्याणकर यांनी काढले.
अकोला पंचायत समिती अंतर्गत असलेल्या कानशिवणी केंद्राची शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणा येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या वेळी त्या उपस्थितांना मार्गदर्शन करीत होत्या.
परिषदेच्या निमित्ताने केंद्रात राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा, विद्यार्थी सुरक्षा, भौतिक सुविधा, शासनाच्या विविध योजनांचा आढावा अशा विविध विषयांवर चर्चा झाली. या वेळी कानशिवणी केंद्राचे केंद्रप्रमुख अतुल बिडवे, उमरी केंद्राचे केंद्रप्रमुख अनिल सोनोने, बी.आर.सी. साधनव्यक्ती अश्विनी हरिनाम, तज्ज्ञ मार्गदर्शक तेजसिंग मोहता, मंगेश पेशकर, राजेश ओहे, मुरलीधर पहाडे यांनीही मार्गदर्शन केले.
सेवानिवृत्ती निमित्त प्रल्हाद गिर्हे व अंजली बिहाडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शाळेसाठी मोलाचे योगदान देणारे युवा प्रशिक्षणार्थी करण इंगळे व सुभाष जोगदंड यांचाही सन्मान करण्यात आला.
परिषद यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा पूजाताई खंडारे, माजी अध्यक्ष रमेश राऊत, पोलीस पाटील पुंडलिकराव राऊत, उपसरपंच कोमल इंगळे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण राऊत, अमोल इंगळे, सखी सावित्री समितीच्या सपना इंगळे, छाया राऊत, बबीता वानखडे, दुर्गाबाई इंगळे, करण इंगळे, संदीप महल्ले गुरुजी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कानशिवणी केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, विषयशिक्षक व सहाय्यक शिक्षक यांची परिषदेला उत्स्फूर्त उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन मेघा बुलबुळे यांनी केले तर आभारप्रदर्शन मुख्याध्यापक राजेश ओहे यांनी केले.

