Kingaon Raja: जिल्हा परिषदेचे गटनिहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता सर्व राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील किनगाव राजा गटाचे आरक्षण सर्वसाधारण निघाल्याने या गटात सर्वांनाच संधी उपलब्ध झाली असून स्पर्धा चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.भाजपकडून निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्याचा निर्णय झाल्याने या गटातून भाजप किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर कायंदे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चाही जोमात सुरू आहे.

भाजपकडून प्रभाकर कायंदे यांच्या नावाची चर्चा; निष्ठावंतांना मिळणार पक्षाची साथ
किनगाव राजा : जिल्हा परिषदेचे गटनिहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता सर्व राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील किनगाव राजा गटाचे आरक्षण सर्वसाधारण निघाल्याने या गटात सर्वांनाच संधी उपलब्ध झाली असून स्पर्धा चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.
भाजपकडून निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्याचा निर्णय झाल्याने या गटातून भाजप किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर कायंदे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चाही जोमात सुरू आहे.
जिल्हा परिषद सर्कलसाठी इच्छुकांची कोंडी सोडवण्यासाठी भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी स्थानिक नेत्यांशी सल्लामसलत करत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या ऑनलाइन सर्व्हेमध्ये प्रभाकर कायंदे यांनी ४९ टक्के मते मिळवत पंचायत समिती पातळीवर बाजी मारली आहे. या निकालाची दखल घेत पक्षातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांना जिल्हा परिषदेतून उमेदवारी द्यावी, असा आग्रह व्यक्त केला आहे.

प्रभाकर कायंदे हे माजी मंत्री भाऊसाहेब पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले कार्यकर्ते आहेत. १९९७ पासून भाजपमध्ये सक्रिय राहून त्यांनी पक्षासाठी सातत्याने काम केले आहे. मागील निवडणुकीत इच्छुक असूनही पक्षाने थांबण्याचा आदेश दिल्यानंतर त्यांनी तो शिस्तीने पाळला होता. तरुणांमध्ये लोकप्रिय, कुशल संघटक आणि आक्रमक शैलीसाठी ओळखले जाणारे शेतकरी नेते कायंदे यांची नुकतीच भाजप जिल्हा सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या २८ वर्षांपासून पक्षाशी असलेली त्यांची निष्ठा, स्थानिक राजकारणातील प्रभाव आणि समाजकारणातील सक्रियता पाहता यंदाच्या निवडणुकीत “न थांबण्याचा” पवित्रा त्यांनी घेतल्याचे समजते. त्यासाठी नागपूर वारीचे नियोजन देखील करण्यात आले आहे.
किनगाव राजा सर्कलमधील गावांमध्येही उमेदवारांची लगबग
जिल्हा परिषदेसाठी किनगाव राजा सर्कलमधील इच्छुक उमेदवारांनी देखील तयारीला वेग दिला आहे. या सर्कलमध्ये दरेगाव, नागझरी, वाघाळा, खैरव, वाकद, ढोरवी, शिवनी, हिवरखेड पूर्णा, तडेगाव, पळसखेड चक्का, उमरद, पिपळखुटा, जळगाव, राहेरी आदी गावांचा समावेश आहे.

