The bugle has sounded: राज्यातील नगर पालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून २४६ पालिका आणि ४२ नगर पंचायतींसाठी २ डिसेंबर राेजी मतदान हाेणार आहे. तसेच ३ डिसेंबर राेजी मतमाेजणी हाेणार आहे.राज्य निवडणुक आयाेगाने ४ नाेव्हेंबर राेजी निवडणुक कार्यक्रमाची घाेषणा केली आहे.

२४६ नगर पालिका, ४२ नगर पंचायतींसाठी निवडणुक कार्यक्रम जाहीर
बुलढाणा : राज्यातील नगर पालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून २४६ पालिका आणि ४२ नगर पंचायतींसाठी २ डिसेंबर राेजी मतदान हाेणार आहे. तसेच ३ डिसेंबर राेजी मतमाेजणी हाेणार आहे.राज्य निवडणुक आयाेगाने ४ नाेव्हेंबर राेजी निवडणुक कार्यक्रमाची घाेषणा केली आहे.
नगर पालिकेसाठी १० नाेव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात हाेणार आहे. १७ नाेव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. १८ नाेव्हेंबर राेजी उमेदवारी अर्जांची छाननी हाेणार आहे. २१ नाेव्हेंबरपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. २६ नाेव्हेंबर राेजी उमेदवारांना निवडणुक चिन्हाचे वितरण करण्यात येणर आहे. तसेच २ डिसेंबर राेजी मतदान हाेणार असून ३ डिसेंबर राेजी मतमाेजणी हाेणार आहे. त्यामुळे, आता निवडणुकांचा राज्यभर धुराळा उडणार आहे.
एक काेटी ७ लाख मतदार करणार मतदान
राज्यातील २४६ नगर पालिका आणि ४२ नगर पंचायती अंतर्गत १ काेटी ७ लाख ३० हजार ५७६ मतदार मतदान करणार आहेत. राज्यात १० नव्याने स्थापन झालेल्या नगर पालिकांसाठीही निवडणुक हाेणार आहे. २८८ नगराध्यक्षपदांबराेबरच सहा हजार ८५९ एकूण सदस्य निवडल्या जाणार आहेत.
ऑनलाईन भरता येईल उमेदवारी अर्ज
राज्य निवडणुक आयाेगाने यावेळी उमेदवारांसाठी ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. निवडणूक आयाेगाच्या वेबसाईटवर उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. ज्या उमेदवारांकडे जात पडताळणी प्रमाणपत्र नाही त्यांना सहा महिन्यांची मुदत मिळणार आहे.
डबल मतदारांवर राहणार वाॅच
राज्यभरात मतदार याद्यांमध्ये डबल नावे असलेल्यांवर आयाेगाचा वाॅच राहणार आहे. मतदार यादीत दाेन वेळा नाव असलेल्यांसाठी विशेष साॅफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. या मतदारांच्या नावासमाेर डबल स्टार नाेंदवण्यात येणार आहे. या मतदारांना एकच मतदान करता येणार आहे.

