Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

The birth anniversary of Rajmata Jijau  :मॉंसाहेब जिजाऊ जन्मोत्सव लोकोत्सव झाला पाहिजे – विजयकुमार घोगरे 

The birth anniversary of Rajmata Jijau  : “राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांचा जन्मोत्सव हा केवळ कार्यक्रम न राहता तो खऱ्या अर्थाने लोकोत्सव झाला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने, नियोजनबद्ध पद्धतीने परिश्रम घ्यावेत,” असे आवाहन मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घोगरे यांनी केले.

The birth anniversary of Rajmata Jijau

आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सवासाठी केंद्रीय समितीची सिंदखेडराजात बैठक

सिंदखेड राजा : “राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांचा जन्मोत्सव हा केवळ कार्यक्रम न राहता तो खऱ्या अर्थाने लोकोत्सव झाला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने, नियोजनबद्ध पद्धतीने परिश्रम घ्यावेत,” असे आवाहन मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घोगरे यांनी केले.
१२ जानेवारी २०२६ रोजी सालाबादप्रमाणे मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे होणाऱ्या भव्य, दिव्य आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याच्या तयारीसाठी मराठा सेवा संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक जिजाऊ सृष्टी, सिंदखेडराजा येथे पार पडली. या बैठकीस विजयकुमार घोगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीच्या सुरुवातीस राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिजाऊ स्तवन झाले. मुख्य बैठकीत जन्मोत्सवाच्या आयोजनासंदर्भातील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, स्थानिक पोलीस स्टेशन, नगरपालिका तसेच एस.टी. महामंडळ यांच्याशी समन्वय साधून जिजाऊ जन्मस्थळ ते जिजाऊ सृष्टी या मार्गावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत अल्प दरात बससेवा सुरू ठेवण्यात यावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. यामुळे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच लाखो जिजाऊ भक्तांना सर्व कार्यक्रमांचा आनंद घेता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यासोबतच जिजाऊ सृष्टी व जिजाऊ जन्मस्थळ परिसरातील पार्किंग व्यवस्थेत सुसूत्रता ठेवणे, वाहतूक अडथळारहित व सुरक्षित ठेवणे, जालना रोडवरील पार्किंगपर्यंत भाविकांना सहज पोहोचता येईल अशी व्यवस्था करणे, तसेच एस.टी. बसेस उपलब्ध नसल्यास स्थानिक शाळांच्या बससेवेचे सहकार्य घेण्यावर सर्वांचे एकमत झाले. यावेळी उपस्थित नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौरभ तायडे यांनीही या सर्व बाबींमध्ये पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
बैठकीत जन्मोत्सवासाठी येणारा खर्च, जमा होणाऱ्या निधीचे नियोजन, पारदर्शकता, तसेच प्रचार–प्रसार व समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करून आयोजनापासून ते जन्मोत्सवापर्यंतची माहिती महाराष्ट्रभर पोहोचवण्यावर भर देण्यात आला.
याप्रसंगी विविध समित्यांची रचना करून त्यांना जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. बुक स्टॉल, शाहीर–पोवाडे, सांस्कृतिक कार्यक्रम, सामूहिक विवाह, साहित्यप्रकार, प्रमुख अतिथी निमंत्रण, महिला व पुरुष निवास व्यवस्था, बाहेरून येणाऱ्या भाविकांची निवास व्यवस्था, दीपोत्सव मशाल व यात्रा, वारकरी दिंडी, व्हीआयपी निवास, सुरक्षा, विचारमंच, सजावट, प्रचार–प्रसार व समाजमाध्यम समित्या अशा अनेक समित्यांचे गठन करून संबंधित संयोजकांची नावे जाहीर करण्यात आली.
बैठकीस जिजाऊ सृष्टीचे अध्यक्ष मधुकर मेहेकरे, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. शिवाजीराव तनपुरे, प्रदेश कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे, संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, मुख्य समन्वयक डॉ. मनोहर तुपकर यांच्यासह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, वारकरी परिषद व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रीय व संयोजन समितीच्या उपस्थित सदस्यांनी जिजाऊ माँसाहेबांचा जन्मोत्सव अधिक भव्य, दिव्य व लोकसहभागातून साजरा करण्यासाठी मौल्यवान सूचना व मार्गदर्शन केले. १२ जानेवारी २०२६ रोजी होणारा जिजाऊ जन्मोत्सव हा इतिहासात नोंद घेण्याजोगा ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top