Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

The auto-rickshaw overturned :दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात ऑटो उलटला, वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू

The auto-rickshaw overturned : दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात ऑटो चालकाने अचानक ब्रेक लावले. त्यामुळे, ऑटो उलटून झालेल्या अपघातात वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू  झाला तर पाच प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना  बाळापूर–वाडेगाव मार्गावर मांडवा फाट्याजवळ मंगळवार ६ जानेवारी रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजता घडली.

The auto-rickshaw

बाळापूर–वाडेगाव मार्गावर भीषण अपघात: पाच प्रवासी गंभीर जखमी

 

राहुल सोनोने

वाडेगाव  : दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात ऑटो चालकाने अचानक ब्रेक लावले. त्यामुळे, ऑटो उलटून झालेल्या अपघातात वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू  झाला तर पाच प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना  बाळापूर–वाडेगाव मार्गावर मांडवा फाट्याजवळ मंगळवार ६ जानेवारी रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजता घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मांडवा फाट्याजवळील लक्ष्मीकांत पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून निघालेल्या एका दुचाकी चालकाची दुचाकी अचानक स्लीप झाली. त्याच वेळी वाडेगावकडून येणाऱ्या ऑटोचालकाने दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात अचानक ब्रेक दाबले, मात्र नियंत्रण सुटल्याने ऑटो रस्त्यावरच उलटला.

या अपघातात ऑटोमधील प्रवासी असलेल्या पंचफुला परमेश्वर वाघ (वय ६७, रा. वाडेगाव) या वृद्ध महिलेवर ऑटो कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच ऑटोमधील इतर पाच प्रवासी गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश झोडगे यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल मो. रफीक शेख, सलीम पठाण व प्रताप राठोड यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.  दरम्यान, या अपघातामुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. घटनेची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top