The annual gathering : शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने संचालित दीनदयाल विद्यालय व कनिष्ठ कला, विज्ञान महाविद्यालय तसेच दीनदयाल ज्ञानपीठ, देऊळगाव राजा येथे आज दि. ३ जानेवारी २०२६ रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचे उत्साहात व दिमाखात उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे होते, तर उद्घाटक म्हणून सतीश कायंदे, सचिव – श्री गजानन महाराज शिक्षण संस्था, उंबरखेड यांनी उपस्थिती लावली.

देऊळगाव राजा : शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने संचालित दीनदयाल विद्यालय व कनिष्ठ कला, विज्ञान महाविद्यालय तसेच दीनदयाल ज्ञानपीठ, देऊळगाव राजा येथे आज दि. ३ जानेवारी २०२६ रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचे उत्साहात व दिमाखात उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे होते, तर उद्घाटक म्हणून सतीश कायंदे, सचिव – श्री गजानन महाराज शिक्षण संस्था, उंबरखेड यांनी उपस्थिती लावली.
विशेष अतिथी म्हणून दादाराव मुसदवाले साहेब, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती देऊळगाव राजा उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीत अरविंद रावजी शिंगणे, गोपालजी बोरा सर, सहदेवराव सुरडकर (पालक संचालक), बाबासाहेब मीनासे (सर्व संचालक, शिक्षण प्रसारक मंडळ, चिखली) तसेच छबुरावजी भावसार, दादाशेठ व्यवहारे, त्र्यंबकरावजी जायभाये (स्थानिक सल्लागार), पुरुषोत्तमजी धनावत (नगर संघचालक, देऊळगाव राजा), रमेशजी डोईफोडे (माजी पर्यवेक्षक), सतीश कुलकर्णी (सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक) आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती, पंडित दीनदयाल उपाध्याय, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. दवणे मॅडम व विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागत गीताने कार्यक्रमात मंगल वातावरण निर्माण झाले.
प्रास्ताविकात विद्यालयाचे प्राचार्य रामेश्वरजी कुटे यांनी शाळेची वाटचाल व वार्षिक स्नेहसंमेलनाचे महत्त्व स्पष्ट केले. उद्घाटक सतीश कायंदे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. तर गटशिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले साहेब यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या स्नेहसंमेलनाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात रामकृष्णदादा शेटे यांनी वार्षिक स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगत, शैक्षणिक गुणवत्ता आणि संस्कार यांचा समतोल साधण्याचे महत्त्व विशद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धेश्वर सरोदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक राजेश भिवटे यांनी केले. यानंतर शालेय सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत इयत्ता ८ ब च्या विद्यार्थिनींनी ‘अयगिरी नंदिनी’ शिवतांडव नृत्य, तर इयत्ता ७ ब च्या विद्यार्थिनींनी ‘देवा श्री गणेशा’ हे नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते रांगोळी व चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या स्नेहसंमेलनामुळे विद्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना नवे व्यासपीठ मिळाले आहे.

