Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Chikhla Kakad :चिखला काकड गावात तणाव; शिवसेना उबाठा महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांना मारहाण

Chikhla Kakad :बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला काकड गावात शिवजयंतीनंतर दुसऱ्याच दिवशी (२० फेब्रुवारी) तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांना मारहाण करून त्यांच्या अंगावरील कपडे फाडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.या घटनेनंतर संजीवनी वाघ यांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर “सगळं संपलं, उद्या सकाळी आत्महत्या करते,” असा मजकूर टाकल्याने परिसरात खळबळ उडाली. हा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गावात तणाव अधिक वाढला.

Chikhla Kakad

आ. सिध्दार्थ खरात, माजी आ.राजेंद्र शिंगणे , शशीकांत खेडेकर यांनी दिली गावाला भेट; गावात बंदोबस्त

अशोक इंगळे

सिंदखेडराजा :  बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला काकड गावात शिवजयंतीनंतर दुसऱ्याच दिवशी (२० फेब्रुवारी) तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांना मारहाण करून त्यांच्या अंगावरील कपडे फाडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.या घटनेनंतर संजीवनी वाघ यांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर “सगळं संपलं, उद्या सकाळी आत्महत्या करते,” असा मजकूर टाकल्याने परिसरात खळबळ उडाली. हा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गावात तणाव अधिक वाढला.दरम्यान, या घटनेनंतर जिल्ह्यातील नेत्यांनी गावात भेट देवून शांतता ठेवण्याचे आवाहन केले. तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

याबाबत संजीवनी वाघ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, काही दिवसांपूर्वी गावात अज्ञात व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा यांचा पुतळा बसवला होता. मात्र, तो पुतळा हलवण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याला विरोध केल्यामुळे गावचे सरपंच आणि त्यांच्या समर्थकांनी काही महिला व पुरुषांना जमा करून आपल्याला बेदम मारहाण केली तसेच अंगावरील कपडे फाडल्याचा आरोप त्यांनी केला. या संदर्भातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचेही सांगितले जात आहे.

दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलिसांच्या उपस्थितीतच ही घटना घडल्याचा दावा करण्यात येत आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाचवण्याची ही सजा आहे का?” असा सवाल संजीवनी वाघ यांनी उपस्थित केला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गावात धाव घेतली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संध्याकाळी उशिरापर्यंत मेहकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात, सिंदखेडराजा मतदारसंघाचे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे तसेच माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांना शांततेचे आवाहन केले. दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पोलिस प्रशासनाकडे केली.

चिखला काकड येथे तसेच पोलिस ठाण्यासमोर मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती. काही काळ रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले. अ‍ॅड. निशिकांत राजे जाधव यांनी घटनास्थळी उपस्थित राहून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.

संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींवर तातडीने कारवाई न झाल्यास न्यायासाठी रस्त्यावर उतरू, असा इशारा दिला आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील  इतर बातम्या वाचण्यासाठी बुलढाणा या पेजला भेट द्या 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top