Sudhakar Pandey :अकोला – प्रोटान (Professors, Teachers and Non-Teaching Wing) ही प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची राष्ट्रीय स्तरावरील संघटना असून, या संघटनेच्या वतीने प्रदान करण्यात येणारा “राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक शिक्षकरत्न पुरस्कार” यंदा पातूर पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद शाळा, चिखलवाड येथील विद्यार्थीप्रिय शिक्षक सुधाकर जानकीराम पांडे यांना प्रदान करण्यात आला आहे.

पातुर : अकोला – प्रोटान (Professors, Teachers and Non-Teaching Wing) ही प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची राष्ट्रीय स्तरावरील संघटना असून, या संघटनेच्या वतीने प्रदान करण्यात येणारा “राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक शिक्षकरत्न पुरस्कार” यंदा पातूर पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद शाळा, चिखलवाड येथील विद्यार्थीप्रिय शिक्षक सुधाकर जानकीराम पांडे यांना प्रदान करण्यात आला आहे.
हा पुरस्कार पुणे येथे दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित कार्यक्रमात देण्यात आला. शिक्षण क्षेत्रासह सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यात त्यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल तसेच कार्यात दाखवलेल्या प्रामाणिकतेबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला आहे.
एवढ्या कमी वयात मिळालेला हा राज्यस्तरीय पुरस्कार समाजासाठी अभिमानास्पद बाब मानली जात असून, सुधाकर पांडे यांच्या या यशाचे सर्व स्तरांतून अभिनंदन व कौतुक होत आहे.

