Teachers’ Literature Conference: शिक्षक साहित्य संमेलन संस्था व शिक्षक भारती यांच्यातर्फे शिक्षकांच्या साहित्य प्रज्ञेचा शोध घेण्यासाठी तसेच अभिजात मराठी भाषा समृद्धीसाठी ११ वे राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाचे आयोजन १४ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे.

शिक्षकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन
अकोला : शिक्षक साहित्य संमेलन संस्था व शिक्षक भारती यांच्यातर्फे शिक्षकांच्या साहित्य प्रज्ञेचा शोध घेण्यासाठी तसेच अभिजात मराठी भाषा समृद्धीसाठी ११ वे राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाचे आयोजन १४ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे.
अकोला येथे होऊ घातलेल्या या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कवी दासू वैद्य उपस्थित राहणार आहेत. तसेच शिक्षक भारतीचे अमरावती विभागीय अध्यक्ष सुरेश देवकर हे स्वागताध्यक्ष आहेत. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने शिक्षकांच्या साहित्यिक प्रतिभेच्या दृष्टीने विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. ऑनलाइन रिल्स, ऑनलाइन एकपात्री अभिनय, स्वरचित काव्य, सचित्र कविता (पोस्टर कविता), समूह गायन, शैक्षणिक साधन या स्पर्धांचे आयोजन केले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. जयवंत पाटील यांनी दिली आहे. स्पर्धेत सहभागासाठी इच्छूकांनी १५ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी जयवंत पाटील (९८६९००७३६१) आणि मनोज देशमुख (९०२८६५५७११) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रा. जयवंत पाटील यांनी केले.

