Maha E-Seva Sanghatana’s strike:महाराष्ट्र राज्य महा ई-सेवा संघटनेच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने राज्यभर घोषित करण्यात आलेल्या बंदला वाडेगावसह संपूर्ण बाळापूर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या पार्श्वभूमीवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

राहुल सोनोने
वाडेगाव : महाराष्ट्र राज्य महा ई-सेवा संघटनेच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने राज्यभर घोषित करण्यात आलेल्या बंदला वाडेगावसह संपूर्ण बाळापूर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या पार्श्वभूमीवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
‘आपले सरकार’ केंद्र चालक संघटनेने राज्यभर बंदचे आवाहन केले होते. त्यास अनुसरून बाळापूर तालुक्यातील सर्व महा ई-सेवा केंद्र दिवसभर बंद राहिले. बंद यशस्वी करण्यासाठी राज्य प्रतिनिधी अनिल गिऱ्हे, जिल्हाध्यक्ष मनीष तिवारी, तालुकाध्यक्ष दिगंबर उगले, दिलीप पातोडे, प्रतिभाताई पंचभाई, गजानन ठोंबरे, विनोद राहुडकर, श्याम अवचार, पंकज इंगळे, गोपाल शिंदे, संजय निंबोकार, महेश जाधव, अमोल पोटदुखे, मनोज तायडे, तोहसिफभाई, राजेंद्र पल्हडे, संदीप ठोंबरे, अब्दुल कयुम, प्रफुल ढगे, अंकित जढाळ आदींसह सर्व सेतू संचालकांनी परिश्रम घेतले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाने मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने लक्ष द्यावे, अन्यथा पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.

