truck hits two-wheeler : भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत पिता-पुत्राचा मृत्यू, तर तिघे जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना १३ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
Speeding truck hits two-wheeler; Father and daughter die, three in critical condition

पिंपळगाव राजा–भालेगाव रस्त्यावरील घटना
पिंपळगाव राजा: भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत पिता-पुत्राचा मृत्यू, तर तिघे जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना १३ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
कवडगाव येथील गणेश शेषराव जाधव (३५) हे पत्नी सपना जाधव (३०), मुलगा आर्यन (१०), अरुण (४) आणि सात महिन्यांचा रुद्र यांच्यासह दुचाकीने (एमएच-२८ एएल-३७४५) पिंपळगाव राजाहून घरी जात होते. भालेगाव बाजारमार्गे जात असताना आरजे-११ जीए-७००२ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.
या अपघातात गणेश जाधव यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमी झालेल्या सपना, आर्यन, अरुण आणि रुद्र यांना तातडीने खामगाव येथील रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान आर्यन जाधव (१०) यालाही डॉक्टरांनी मृत घोषित केले. परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
पिता–पुत्राचे अंत्यसंस्कार कवडगाव येथे शुक्रवारी दुपारी तीन वाजता अत्यंत शोकाकुल वातावरणात पार पडले.
चालक फरार; गुन्हा दाखल
अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. पिंपळगाव राजा पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून, बळीराम रतन चव्हाण यांच्या तक्रारीवरून चालकाविरुद्ध IPC कलम १०६(१), २८१, ३४२(४), १२५(क), १२५(ख) बीएसएन २०२३ तसेच मोटार वाहन अधिनियमांतर्गत कलम १८४, १३४(अ), १८७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पुढील तपास ठाणेदार भागवत मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

