Speeding tractor and bike: भरधाव ट्रॅक्टर आणि दुचाकीची धडक झाल्याने युवक ठार तर एक जण गंभीर जखमी झाला.ही घटना कापशी–वाडेगाव मार्गावरील कापशी तलावाजवळील सांडव्याच्या नाल्यावर गुरुवारी (२० नोव्हेंबर) दुपारी सुमारास घडली. रामरतन भगवान वाघ(वय ३६ रा. कालखेड ता.शेगाव) असे मृतक तरुणाचे नाव आहे.

कापशी–वाडेगाव रस्त्यावरील घटना
राहुल सोनोने
वाडेगाव : भरधाव ट्रॅक्टर आणि दुचाकीची धडक झाल्याने युवक ठार तर एक जण गंभीर जखमी झाला.ही घटना कापशी–वाडेगाव मार्गावरील कापशी तलावाजवळील सांडव्याच्या नाल्यावर गुरुवारी (२० नोव्हेंबर) दुपारी सुमारास घडली. रामरतन भगवान वाघ(वय ३६ रा. कालखेड ता.शेगाव) असे मृतक तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टर (क्रमांक MH 30 AB 9430) कापशीकडून वाडेगावच्या दिशेने जात होता. तर दुचाकी (क्रमांक MH 30 BN 6511) वाडेगावकडून कापशीकडे येत होती. या दरम्यान झालेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील मिलिंद गणेश खंडारे (वय ३६, रा. सस्ती, ता. पातूर) हे गंभीर जखमी झाले. तसेच रामरतन भगवान वाघ (वय २६, रा. काळखेड, ता. शेगाव) यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघांना रुग्णवाहिकेतून अकोला येथील रुग्णालयात हलविले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी रामरतन वाघ यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
सस्ती येथील जावई आणि मेहुण्याच्या अपघाताच्या बातमीनेही गावात शोककळा पसरली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास पोलीस करत आहेत.

