Sore throat, fever, cold: शहरात गत काही दिवसांपासून हाेत असलेल्या वातावरणातील बदलाचा फटका लहान मुलांसह ज्येष्ठांना बसत आहे. लहान मुलांना घसा दुखने, ताप आणि सर्दी हे आजार हाेत आहेत. त्यामुळे, खासगी रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

वातावणातील बदलाचा बसताेय फटका
बुलढाणा : शहरात गत काही दिवसांपासून हाेत असलेल्या वातावरणातील बदलाचा फटका लहान मुलांसह ज्येष्ठांना बसत आहे. लहान मुलांना घसा दुखने, ताप आणि सर्दी हे आजार हाेत आहेत. त्यामुळे, खासगी रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
बुलढाणा शहरात गत काही दिवसांपासून कधी ऊन तर कधी पाऊस. सतत दोन ते तीन दिवस पावसाची रिपरिप यामुळे आरोग्याचे संतुलन बिघडले आहे. गेल्या काही दिवसांपासून पाऊस, ढगाळ वातावरण व कमी अधिक तापमानामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. विशेष म्हणजे बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. न्युमोनिया सारखा आजार बळावण्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. बाळांसमारे शिकणे व खोकलणेही टाळणे आवश्यक आहे.
वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, घसा खवखवणे, मळमळ होणे, उलटी होणे आदी प्रकारचा त्रास सुरु झाला होता. त्यामुळे अनेकांनी दवाखान्यात जाऊन उपचार केले. काहींनी घरगुती उपचारही केले. आता उपचाराच्या अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.
लहान बाळांची काळजी घ्या : डॉ. योगेश शेवाळे
वातावरणातील बदलामुळे लहान मुलांना सर्दी, खाेकला, ताप येत आहे. पालकांनी , बाहेरून आल्यावर साबण व पाण्याने हात स्वच्छ धुणे, मुलांना गर्दीच्या ठिकाणी घेऊन
जाणे टाळा, आजारी माणसांपासून बाळाला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा, बाळाच्या सानिध्यात शिंकू, खोकळू नका, खरंतर बाळाला घराबाहेर काढूच नका, जास्त लोकांनी हाताळू नका, त्याला हात स्वच्छ धुतल्या शिवाय घेऊ नका, कारण सध्या आमची बच्चेकंपनी सर्दी खोकला, ब्राँकिओलायटीस आणि न्युमोनिया सारख्या आजारांनी हैराण झाली आहे. बहुतांश इन्फ्लुएंझा, रेस्पीरेटरी सिनशेशल व्हायरस सारख्या विषाणूंच्या संसर्गाचा तो परिणाम आहे. त्याला वातावरणातले बदल कारणीभूत आहेत.आजारी पडलेल्या बाळांना लवकरच बालराेग तज्ज्ञांना दाखवा.दिलेली औषधे काटेकाेरपणे घ्या. कुठलेही धाेकादायक लक्षणे आढळल्यास जसे श्वास जाेरात घेणे, धापा टाकणे, दुध कमी पिणे, खानेपिणे कमी करणे, ताप वाढणे अशा गाेष्टी आढळल्यास त्वरीत डाॅक्टरांना दाखवा, असे बालराेगतज्ज्ञ डॉ. योगेश शेवाळे यांनी सांगितले.

