Severe cold hits: राज्यात थंडीचा जोर चांगलाच वाढला असून त्याचा सर्वाधिक परिणाम वयोवृद्ध, बालक व रुग्णांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. वातावरणातील गारठ्यामुळे सर्दी, ताप व खोकल्याच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. परिणामी ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोट्यांचा आधार घेताना नागरिक दिसत आहेत.

रमेश खंडागळे
बीबी : राज्यात थंडीचा जोर चांगलाच वाढला असून त्याचा सर्वाधिक परिणाम वयोवृद्ध, बालक व रुग्णांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. वातावरणातील गारठ्यामुळे सर्दी, ताप व खोकल्याच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. परिणामी ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोट्यांचा आधार घेताना नागरिक दिसत आहेत.
पावसाचा जोर ओसरण्यासोबतच निर्माण झालेल्या पोषक वातावरणामुळे थंडी आणखी वाढली आहे. कोरडे हवामान, पहाटेची गार हवा आणि सायंकाळी वाढणारा गारठा यामुळे नागरिकांना हुडहुडी भरवत थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. यापुढेही थंडी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली असून उबदार कपड्यांची मागणी बाजारात वाढली आहे.
दरम्यान, गहू, हरभरा आणि ज्वारी या पिकांसाठी सद्यस्थितीतील थंडी पोषक ठरत आहे. मात्र वयोवृद्ध, लहान मुले आणि रुग्ण यांनी उबदार कपडे घालूनच घराबाहेर पडावे, तसेच थंडीचा आरोग्यावर होणारा परिणाम टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. शरद कोहिटे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय बीबी यांनी केले आहे.

