‘Savale Hospital : ग्रामीण जनतेसाठी अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मासरूळ येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ‘सावळे हॉस्पिटल’चा उदघाटन समारंभ रविवार, दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे.

मासरूळ : ग्रामीण जनतेसाठी अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मासरूळ येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ‘सावळे हॉस्पिटल’चा उदघाटन समारंभ रविवार, दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे.
या हॉस्पिटलचे उदघाटन ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज शेलुदकर (संस्थापक, नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्र, शेलुद), ह.भ.प. सदाशिव महाराज, ह.भ.प. विष्णु महाराज सास्ते(विश्व वारकरी संघ जिल्हाध्यक्ष, जालना), ह.भ.प. नामदेव बाबा सिनकर यांच्या हस्ते हाेणार आहे.
या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार श्वेताताई महाले, शिवसेना संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर,शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, शिवसेना उपनेत्या उबाठा जयश्रीताई शेळके, माजी आमदार राहुल बाेंद्रे, माजी आमदार विजयराज शिंदे, काॅंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज दांडगे, शिवसेना तालुका प्रमुख लखन गाडेकर, शासकीय कंत्राटदार अरुण तायडे, राजू नरोटे, राजधर देवकर पाटील, . बाबुराव उंवरकर, माजी पंचायत समिती सदस्य दिलीप सिनकर, भास्कर देशमुख, शिवशाही काॅन्व्हेंट आणि ज्युनियर काॅलेजचे अध्यक्ष दाैलतराव नरवाडे, शिवशाई बॅंकेचे अध्यक्ष दत्तात्रय लहाने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. अशोक भवटे, डॉ. प्रवीण चाटे, डॉ. तायडे, डॉ. फुसे, डॉ. मारोती चाटे, डॉ. राहुल मेहेत्रे, डॉ. वानखेडे, डॉ. उंबरकर, डॉ. काटोले, डॉ. देवकर, डॉ. वानेरे, डॉ. मांटे आदी मान्यवर डॉक्टरांचीदेखील विशेष उपस्थिती राहणार आहे.
या हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. किरण राजू सावळे (B.H.M.S, M.D. [AM], Nashik, PODEMS Pune) असून, त्यांनी ग्रामीण भागात दर्जेदार व किफायतशीर आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे ध्येय ठेवले आहे.
उपलब्ध उपचार व सुविधा:
ताप, सर्दी, खोकला, साथीचे रोग (मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया इ.), पोटाचे विकार, हृदयरोग (उच्च रक्तदाब इ.), किडनी विकार (स्टोन इ.), मधुमेह, थायरॉईड, रक्तविकार (अॅनिमिया इ.) आदी आजारांवर तज्ज्ञ उपचार दिले जाणार आहेत.
अत्याधुनिक सुविधा:
२४ तास वैद्यकीय सेवा, बाह्यरुग्ण विभाग (OPD), आंतररुग्ण विभाग (IPD), डे केअर सुविधा, नेब्युलायझेशन, ग्लुकोमीटर, पल्स ऑक्सिमीटर, टाके घालणे, मूत्रविकार उपचार तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र आदी सेवा उपलब्ध असतील.
या नवीन हॉस्पिटलमुळे मासरूळ व परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळणार असून, स्थानिक जनतेमध्ये या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे.
पत्ता: ग्रामपंचायत जवळ, मासरूळ, ता. जि. बुलढाणा
संपर्क: ९५२७३०९५१५ / ९०११३५९९४४ / ८८३०८८३८२१

