Reservation: जिल्हा परिषदेच्या ६१ जागांचे आरक्षण १३ ऑक्टाेबर राेजी जाहीर करण्यात आले. तब्बल ३१ जागा महिलांसाठी राखीव झाल्याने इच्छुकांच्या इच्छेवर पाणी फिरले आहे. आता या उमेदवारांना आपल्या धर्मपत्नींना रिंगणात उभे करावे लागणार आहे.

महिला आरक्षणाने इच्छुकांच्या इच्छेवर फिरले पाणी : ३१ जागा महिलांसाठी राखीव
बुलढाणा : जिल्हा परिषदेच्या ६१ जागांचे आरक्षण १३ ऑक्टाेबर राेजी जाहीर करण्यात आले. तब्बल ३१ जागा महिलांसाठी राखीव झाल्याने इच्छुकांच्या इच्छेवर पाणी फिरले आहे. आता या उमेदवारांना आपल्या धर्मपत्नींना रिंगणात उभे करावे लागणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत आणि सर्व पंचायत समित्यांच्या सभापती पदाच्या आरक्षणाची सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे पार पडली. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत पद्धतीने प्रक्रिया पार पडली.
अनुसूचित जाती एकूण १२ जागेपैकी सर्वसाधारण ६, महिला ६, अनुसूचित जमाती एकूण ३ जागेपैकी सर्वसाधारण १, महिला २, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण १६ जागेपैकी सर्वसाधारण ८, महिला ८, सर्वसाधारण एकूण ३० जागेपैकी सर्वसाधारण १५, महिला १५ अश्या एकूण ६१ जागांसाठी आरक्षण सोडत उत्साहात पार पडली.
या सोडतीच्या प्रक्रियेस मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार, तहसीलदार संजय बगाडे आदींसह संबंधित अधिकारी, जनप्रतिनिधी तसेच विविध पंचायत समित्यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
असे निघाले जिल्हा परिषद गट निहाय आरक्षण
जळगाव जामाेद
जामोद : अनुसूचित जमाती
खेर्डा बु. : सर्वसाधारणआसलगांव : अनुसूचित जमाती (महिला)पिंपळगांव काळे : सर्वसाधारणसंग्रामपूरसोनाळा : अनुसूचित जमाती (महिला)बावणबीर : सर्वसाधारण (महिला)पळशी झाशी : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गपातुर्डा बु. : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)शेगावमाटरगांव बु : अनुसूचित जातीजलंब : अनुसूचित जाती (महिला)नांदुरानिमगांव : सर्वसाधारण (महिला)वसाडी बु. : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गचांदूर बिस्वा : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गवडनेर भोलजी : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गमलकापूरनरवेल : सर्वसाधारण (महिला)मलकापूर ग्रामीण : सर्वसाधारण (महिला)दाताळा : सर्वसाधारण (महिला)माेताळापिंप्रीगवळी : सर्वसाधारणकोथळी : सर्वसाधारणधामणगांव बढे : सर्वसाधारण (महिला)रोहिणखेड : सर्वसाधारणबोराखेडी : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गखामगावसुटाळा बु. : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)घाटपुरी : सर्वसाधारणअटाळी : अनुसूचित जातीअंत्रज : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गपिंपळगांव राजा : सर्वसाधारण (महिला)कुंबेफळ : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)लाखनवाडा बु. : अनुसूचित जातीमेहकरदेऊळगांव साकर्शा : सर्वसाधारण (महिला)डोणगांव : सर्वसाधारणअंजनी बु : सर्वसाधारणजानेफळ : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गकळंबेश्वर : अनुसूचित जाती (महिला)देऊळगांव माळी : अनुसूचित जातीउकळी : सर्वसाधारण (महिला)चिखलीउदयनगर : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गअमडापुर : सर्वसाधारण (महिला)इसोली : सर्वसाधारणसवणा : सर्वसाधारण (महिला)केळवद : अनुसुचीत जाती (महिला)शेळगाव आटोळ : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)मेरा बु. : अनुसूचित जाती (महिला)बुलढाणादेऊळघाट : सर्वसाधारण (महिला)सुंदरखेड : अनुसूचित जाती (महिला)साखळी बु. : सर्वसाधारण (महिला)मासरुळ : सर्वसाधारणधाड : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)रायपुर : सर्वसाधारण (महिला)देऊळगाव राजादेऊळगांवमही : सर्वसाधारणसिनगाँव जहाँगीर : सर्वसाधारणसावखेड भोई : अनुसूचित जातीसिंदखेड राजासाखरखेर्डा : सर्वसाधारण (महिला)शेंदुर्जन :नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)किनगांव राजा : सर्वसाधारणदुसरबीड : अनुसूचित जाती (महिला)वर्दडी बु. : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)लाेणारसुलतानपुर : सर्वसाधारणवेणी : अनुसूचित जातीबिबी : सर्वसाधारणपांग्रा डोळे : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)

