Rainbow of Emotions: साहित्यविश्वात आपल्या संवेदनशील लेखनशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रा. डॉ. शीला श्रीकृष्ण रोकडे यांच्या नवीन कवितासंग्रह “भावनांचे इंद्रधनुष्य” चे नुकतेच प्रकाशन झाले. विविध भावविश्वांना स्पर्श करणारा हा संग्रह वाचकांच्या मनाचा ठाव घेईल, असा आत्मविश्वास प्रकाशकांनी व्यक्त केला आहे.

भावविश्वाच्या सात रंगांची काव्यमय मेजवानी!
बुलडाणा : साहित्यविश्वात आपल्या संवेदनशील लेखनशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रा. डॉ. शीला श्रीकृष्ण रोकडे यांच्या नवीन कवितासंग्रह “भावनांचे इंद्रधनुष्य” चे नुकतेच प्रकाशन झाले. विविध भावविश्वांना स्पर्श करणारा हा संग्रह वाचकांच्या मनाचा ठाव घेईल, असा आत्मविश्वास प्रकाशकांनी व्यक्त केला आहे.
या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर निसर्गातील इंद्रधनुष्याचे रम्य दृश्य आणि त्याला पूरक अशी आकर्षक रचना मन मोहवते. मानवी भावनांचे सात रंग कवितांमधून सुंदरपणे उलगडत जाणे, हे या संग्रहाचे वैशिष्ट्य आहे.
बुलढाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये कार्यरत प्रा. डॉ.शीला रोकडे यांचा हा कविता संग्रह आहे.
त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 तसेच National Award 2025 – Best PhD Thesis पुरस्कार मिळाला आहे.

