nominations on the fourth day: जिल्ह्यात ११ नगर पालिका निवडणुक आता शिगेला पोहचली असून चौथ्या दिवशी उमेदवारी अर्जांचा पाऊस पडला. अध्यक्ष पदासाठी १४ तर सदस्य पदासाठी ३६४ अर्ज दाखल झाले आहेत.आता पर्यंत ११ नगर पालिकांच्या अध्यक्ष पदासाठी २८ तर सदस्य पदासाठी ५१५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.सोमवारी अर्ज भरण्याची मुदत आहे.त्यामुळे अर्जांची संख्या आणखी वाढली.

बुलढाणा: जिल्ह्यात ११ नगर पालिका निवडणुक आता शिगेला पोहचली असून चौथ्या दिवशी उमेदवारी अर्जांचा पाऊस पडला. अध्यक्ष पदासाठी १४ तर सदस्य पदासाठी ३६४ अर्ज दाखल झाले आहेत.आता पर्यंत ११ नगर पालिकांच्या अध्यक्ष पदासाठी २८ तर सदस्य पदासाठी ५१५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.सोमवारी अर्ज भरण्याची मुदत आहे.त्यामुळे अर्जांची संख्या आणखी वाढली.
जिल्ह्यात ११ नगर पालकांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.सुरुवातीचे दोन दिवस अर्ज नाममात्र दाखल झाले होते.त्यानंतर १४ आणि १५ नोव्हेंबरला अर्जांची सख्या वाढली आहे.आता युती आघाड्या दोन दिवसात निश्चित होणार असून निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.११ नगराध्यक्ष पदासाठी १५ नोव्हेंबर रोजी २८ अर्ज दाखल झाले आहेत.तसेच सदस्य पदासाठी ५१५ अर्ज दाखल झाले आहेत.मेहकर नगर पालिकेत सदस्य पदासाठी सर्वांधिक १७९ अर्ज दाखल झाले आहेत.
१५ नोव्हेंबर रोजी असे दाखल झाले अर्ज
पालिका अध्यक्ष सदस्य
बुलढाणा ०० ३०
चिखली २ ५६
देऊळगाव राजा ०० ०७
खामगाव ०० ०६
लोणार ०१ २४
मलकापूर ०३ ३५
मेहकर ०२ १२७
नांदुरा ०१ २७
शेगाव ०५ २१
सिंदखेड राजा ०० ०२

