Raid on Warli gambling: उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गायगाव येथील वरली जुगारावर पोलिसांनी १९ नोव्हेंबर रोजी धाड टाकून एकावर कारवाई केली. त्याच्याकडून वरलीचे साहित्य आणि रोख १ हजार ८१० रुपये जप्त केले.

उरळ पोलिसांची कारवाई : गुन्हा दाखल
राहुल सोनोने
वाडेगाव : उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गायगाव येथील वरली जुगारावर पोलिसांनी १९ नोव्हेंबर रोजी धाड टाकून एकावर कारवाई केली. त्याच्याकडून वरलीचे साहित्य आणि रोख १ हजार ८१० रुपये जप्त केले.
गायगाव येथे वरलीचा जुगार सुरू असल्याची माहिती उरळ पोलिस स्टेशनचे ठाणेदार पंकज कांबळे यांना मिळाली.या माहितीच्या आधारे त्यांनी पथकासह धाड टाकली असता रमेश वाकोडे रा. गायगाव हा जुगार चालवत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्याच्याकडून एक ते दहा आकडे लिहिलेला टाईम क्लोज वरलीचे दहा चिठ्ठ्या व एक पेन एक कार्बन तुकडा व नगदी १ हजार ८१० रुपये जप्त केले. त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन ,उरळ पोलिस स्टेशनचे ठाणेदार एपीआय पंकज कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मोहाडे, पोलिस हवालदार नेमाडे ,पोलीस शिपाई वानखेडे तसेच वाकोडे यांनी कारवाई केली .

